26 C
Mumbai
Thursday, January 2, 2025
घरविशेषअजबचं! कोण आधी फोटो काढणार? प्रश्नावरून लग्न मंडपात हाणामारी

अजबचं! कोण आधी फोटो काढणार? प्रश्नावरून लग्न मंडपात हाणामारी

हा प्रकार गुरुवार, ८ डिसेंबर रोजी घडला आहे.

Google News Follow

Related

भारतामध्ये लग्नसमारंभाला खूप महत्व आहे. लग्नसमारंभाला खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात त्यामुळे गोंधळ होणं साहजिक असते. मात्र, लग्नामध्ये वधू-वर पक्षात हाणामारी होणं म्हणजे नवलंच आहे. हाणामारी तेही फोटो पहिल्यांदा कोण काढणार असा हाणामारीचा अनपेक्षित प्रकार एका लग्नात घडला आहे.

उत्तर प्रदेशमधील एका लग्नामध्ये ही घटना घडली आहे. वधू-वराची एकमेकांना वरमाला घालण्याचा विधी झाल्यानंतर वरपक्ष आणि वधूपक्षामध्ये फोटोवरुन वाद सुरु झाला. नवदांपत्याचे फोटो आधी कोणी काढायाचे हा वादाचा मुद्दा होता. या वादामध्ये आधी शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर या बाचाबाचीचं रुपांतर थेट हाणामारीमध्ये झालं.

हा प्रकार गुरुवार, ८ डिसेंबर रोजी घडला. लग्नामध्ये नातेवाईकांबरोबर फोटो काढण्यास सुरुवात झाली. यावेळी दारुच्या नशेत असलेल्या मुलीकडच्या वऱ्हाड्यांनी आम्हीचं आधी फोटो काढणार असं म्हणत वधू-वरांच्या आजूबाजूला उभं राहण्यास सुरुवात केली. वरपक्षाकडील नातेवाईकांनीही हीच मागणी केली. बाचाबाची झाली आणि मग पुढे धक्काबुक्की आणि नंतर मारहाणीत झालं. मुलीच्या काकांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाच बेदम मारहाण करण्यात आलं. यामध्ये मुलीच्या बहिणीलाही मारहाण करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

पदयात्रेला ब्रेक देऊन राहुल गांधी परदेश यात्रेला जाणार?

नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी तयार राहा, म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक

पेरूमधील आंदोलकांनी विमानतळ घेतले ताब्यात ; पोलिस अधिकाऱ्यांना ठेवले ‘ओलीस’

बस उलटून २ शाळकरी मुलांना गमवावे लागले प्राण

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर लग्नमंडपामधील हाणामारीत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. या अनपेक्षित प्रकारामुळे नवरा वैतागला आणि त्याने लग्न करण्यास नकार दिला. मात्र, नंतर त्याची समजूत काढल्यानंतर त्याने लग्नास होकार दिला आणि अखेर त्यांचे लग्न पार पडले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा