भूषण देसाई यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. गेले कित्येक दिवस याची चर्चा रंगली होती. यावेळी पत्रकारांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकडे अधिवेशन सुरू आहे आणि इकडे पण आपला कार्यक्रम सुरू आहे असा टोला लगावला. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं. त्यांची भूमिका आणि विचार पुढे नेण्याचं काम आम्ही आणि शिवसैनिक करतोय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून, तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ठाकरेंना रामराम केल्यानंतर तेव्हा ५० आमदार आणि १३ खासदार सोबत आले. शेकडो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, समिती सदस्य, लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर सोबत काम करू लागले. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन दिलं, पाठिंबा दिला.
महाराष्ट्रातल्या विकासाची कामे करतोय, या राज्यातल्या सर्वसामान्यांना लोकांना न्याय देण्याचे काम, नुकत्याच झालेला अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या हिताचं प्रतिबिंब उमटलं आहे. या राज्याचं सर्वांगिण विकास करणारे निर्णय आम्ही घेतोय. मुंबई गेल्या सहा-सात महिन्यात बदलतेय, मुंबईचं रुपडं पालटतंय. मुंबईकडे ज्यांच्याकडे सत्ता होती अनेक वर्ष त्यांना ते करता आलं नाही. दुर्दैवाने लोकांना अनेक वर्ष खड्यातून प्रवास करावा लागला. अनेक गैरसोयींना सामोरं जावं लागलं. म्हणून लोकांमध्ये एक भावना निर्माण झाली की हे काम करणारं सरकार आहे. त्यामुळे भूषण देसाई यांनीदेखील निर्णय घेतला की काम करणाऱ्या लोकांच्या सोबत राहायचं. म्हणून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा :
राज्यातील कैद्यांना आता ‘तुुडुंब’वास; सगळ्या तुरुंगात गर्दी
शीतल म्हात्रे व्हिडीओ व्हायरल प्रकरण एसआयटीकडे देणार
राज्यातील कैद्यांना आता ‘तुुडुंब’वास; सगळ्या तुरुंगात गर्दी
भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हणाले की, बाळासाहेब हेच माझे दैवत आणि दुसरे शिवसेना या दोन शब्दांना सोडून माझ्या समोर दुसरे काही आलेले मला काही आठवत नाही. हिंदुत्वाचा विचार या राज्यासाठी बघितलेले जे स्वप्न होतं, स्वरुप होतं ते जर आज कोणी पुढे घेऊन जात असेल, या महाराष्ट्रात साहेबांचे विचार आणि विकास तर ते शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हेच पुढे घेऊन जाताहेत, वाढवताहेत. त्यांचा कामाचा वेग, त्यांचे निर्णय, त्यांची क्षमता आणि इथे सर्वसामान्य जनतेला त्यांच्या इथे कारभार बघायला मिळतो तो मी जवळून अनुभवला आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर पाठिशी उभा राहण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि या शिवसेनेमध्ये जो फरक आहे, त्यामुळे मी इथे आलो आहे असे भूषण देसाई म्हणाले.