सण, उत्सव असल्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका आत्ता नाहीत

सण, उत्सव असल्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका आत्ता नाहीत

भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राच्या निवडणुका आज जाहीर होतील, अशा चर्चा सुरु असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांच्या संबोधनात जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात अनेक सण आहेत.गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन दोन राज्यांच्या निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असे राजीव कुमार म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आज जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. निवडणूक का जाहीर केली जात नाही, असं राजीव कुमार यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी असा प्रश्न विचारणे सोपे आहे, असे उत्तर दिले.

हेही वाचा..

आंदोलनामुळे ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे नुकसान झाले!

महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी

फेसबुकवर नाही तर फेस टू फेस काम करणारे सरकार

कलम ३७० रद्दनंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच होणार विधानसभा निवडणुका

महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती. हरियाणाची मुदत ३ नोव्हेंबर होती तर महाराष्ट्राची २६ नोव्हेंबर आहे. त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच निवडणुकांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आहे. सुरक्षा बलांचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात पाऊस झाला होता त्यामुळे बीएलओची कामे झालेली नाहीत.

हरियाणा विधानसभेतील सदस्यसंख्या ९० इतकी आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपणार आहे. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि जेजेपीनं सत्ता स्थापन केली होती. हरियाणात एनडीएकडे ४३ आणि इंडिया आघाडीकडे ४२ आमदारांचे संख्याबळ आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहा वर्षानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे.

जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात २४, दुसऱ्या टप्प्यात २६ आणि तिसऱ्या टप्प्यात ४० मतदारसंघात मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान २९ सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होईल. तर जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल ४ ऑक्टोबरला जाहीर होईल.

Exit mobile version