सरकारच्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी आहे. दुकानांची वेळ ७-७ करावी तसंच शनिवारी-रविवारीही दुकानं उघडी ठेवायला परवानगी मिळावी या मागण्या व्यापारी संघटनांनी केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास, या शनिवारी आणि रविवारीसुद्धा सुद्धा दुकान उघडी ठेवणार असल्याचा इशारा दादर व्यापारी संघटनेने दिला असून नियमांमध्ये शिथिलता मिळत नसल्यानं व्यापारी आक्रमक झाले आहेत. नियमांमध्ये शिथिलता न मिळाल्यास मतदानाच्या वेळी दाखवून देऊ, अशा शब्दात व्यापाऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
काही दिवसांत निर्बंध शिथिल झाले नाहीत तर व्यापारी सरकारच्या विरोधात निदर्शने करणार आहेत. तसेच आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांवर आम्ही बहिष्कार टाकू,’ असे फेडरेशनचे विरेन शहा यांनी म्हटले आहे.
सरकारने दुकानांबाबत लादलेल्या निर्बंधांमुळे दादर व्यापारी संघ आक्रमक झाला आहे. शनिवार रविवार अनेकांना सुट्टी असताना ज्या दिवशी लोक खरेदीला येतात. त्याच दिवशी दुकान बंद असल्याने याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसतो आहे. शिवाय, सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ग्राहक दुकानात फिरकत नसल्याने ही वेळ ७ ते ७ तरी किमान वाढवून द्यावी अशी मागणी दादर व्यापारी संघाने केली आहे.
अनेकदा म्हणणं मांडून सुद्धा जर सरकार ऐकत नसेल तर नियम मोडून शनिवार रविवारी दुकान उघडी ठेवल्या शिवाय पर्याय नसल्याच व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय, यावर निर्णय न घेतल्यास वोटिंगच्या वेळेस आम्ही दाखवून देऊ असा इशारा व्यापारी संघाने दिला आहे.
हे ही वाचा:
विदर्भातील तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत
१५ ऑगस्ट पूर्वी उत्तर प्रदेशात करायचे होते बॉम्बस्फोट
ईडी करणार सचिन वाझेवर प्रश्नांचा मारा!
उत्तर प्रदेश एटीएसने उधळला अल कायदाचा कट…दोन दहशतवादी अटकेत
कोल्हापुरातील व्यापारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाच दिवसांची मुदत दिल्यानंतर आजपासून पुन्हा एकदा कोल्हापुरातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत..मात्र व्यापाऱ्यांच्या काही संघटना दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत. पाच दिवसांमध्ये कोल्हापूर शहरात पॉझिटीव्हीटी रेट वाढला नाही, असा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आम्हाला सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.