मेधा किरीट सोमैया मानहानी खटल्यामध्ये उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या अपीलावर आज (२४ ऑक्टोबर) माझगाव येथील मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश पिंगळे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. मात्र, संजय राऊत आज उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांच्या अपीलावर किंवा त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी करता येणार अशी हरकत सोमैयांचे वकिल अॅड. लक्ष्मण कनाल आणि अॅड. विवेकानंद गुप्ता यांनी घेतली. न्यायालयाने सोमैयांच्या वकिलांची हरकत मान्य केली व आजची सुनावणी पुढे ढकलली. परंतु, संजय राऊत जर हजर झाले नाहीत तर त्यांना अटक केली जाणार असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांनी याबाबत माहिती देताना म्हटले, संजय राऊत यांना मानहानी खटल्यात १५ दिवसांची शिक्षा सुनावली होती. माझगाव न्यायालयाने त्यांना ३० दिवसांचा अंतरीम जामीन दिला होता. या प्रकरणी कोर्टात आज सुनावणी होती. मात्र, संजय राऊत उपस्थित राहिले नाहीत. संजय राऊत यांची अंतरिम जामिनाची मुदत उद्या संपत असून उद्या संद्याकाळी ५ वाजता त्यांना अटक केली जाणार आहे.
तत्पूर्वी, संजय राऊत यांच्या वकिलांनी कोर्टाला उद्याच्या तारखेची विनंती करत त्यांना हजर करण्याचे आश्वासन दिले. आता या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे. उद्या संध्याकाळ पर्यंत संजय राऊत यांनी पुन्हा जामीन मिळवला नाही किंवा त्यांची अपील दाखल झाली नाही तर संजय राऊत यांची अटक होऊ शकते, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
हे ही वाचा :
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार!
अल्पवयीन विद्यार्थ्याने ब्लेडने कापून घेतले आणि हिंदू नेत्याने अपहरण केल्याचा बनाव रचला
पालिकेचे खबरी समजून तिघांना विवस्त्र करत गुप्तांगांना दिले शॉक
प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अल्पवयीन मुस्लीम तरुणाला अटक
दरम्यान, मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत दोषी आढळून आले होते. माझगाव कोर्टाने त्यांना दोषी ठरवले होते. या प्रकरणी कोर्टाने संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे.