टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला मीराबाई चानूने पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं आहे. मीराबाई चानूचं रौप्य पदक सुवर्णपदकामध्ये बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, सुवर्णपदक विजेती चीनची वेटलिफ्टर जजिहू हिची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे. जजिहू डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यास मीराबाई चानू हिला सुवर्णपदक मिळू शकतं. मीराबाई चानू सध्या भारतात दाखल झालेली आहे. मीराबाई चानूने ४९ किलोग्राम महिला वर्गात स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल २०२ किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं होतं.
सुवर्णपदक विजेती चीनची वेटलिफ्टर जजिहू हिला डोपिंग टेस्टसाठी टोक्योमध्ये थांबण्यास सांगण्यात आलं आहे. जजिहू डोपिंग टेस्टमध्ये दोषी ठरल्यास मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळू शकते. जजिहूची डोपिंग टेस्ट होणार असल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिला आहे.
४९ किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात ८१ किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलोग्राम वजन उचलंल. तिसऱ्या प्रयत्नात तिने ८९ किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ ८७ किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने ९४ किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला.
हे ही वाचा:
मालकाला खूश करण्यासाठी भास्कर जाधवांचं गैरवर्तन
लसीच्या २ डोस नंतर अजून एक डोस?
कोल्हापूरावर पुन्हा पुराचं सावट?
त्यानंतर क्लीन अँड जर्क राउंडची सुरुवात झाली आणि मीराबाईने पहिल्या प्रयत्नातच अप्रतिम कामगिरी करत ११० किलो वजन उचलला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ११५ किलो वजन उचललं. पण अखेरच्या तिसऱ्या प्रयत्नात ११७ किलो वजन उचलण्यात ती अयशस्वी ठरली. ज्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर चीनच्या जजिहुने क्लीन अँड जर्कमध्ये ११६ किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलं होतं. जजिहूनं मीराबाई चानू पेक्षा एकूण स्पर्धेत ८ किलो जास्त वजन उचललं होतं.