केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि राहुल गांधी यांच्यात सुरू असलेला वाद अधिकच वाढताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री बिट्टू यांनी राहुल यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर कर्नाटकमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नसल्याचे मंत्री बिट्टू यांनी म्हटले आहे. आता तर मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी गांधी कुटुंबांवर हल्ला चढवला आहे. गांधी कुटुंबाकडून पंजाबला जाळण्याचे काम झाल्याचे मंत्री बिट्टू यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसकडून टीका केली जात आहे, राहुल गांधींची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे, असा प्रश्न मंत्री बिट्टू यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, राहुल गांधींविरोधात केलेल्या वक्तव्याचा मला पश्चाताप नाही. तसेच मी का पश्चाताप करू?, पंजाबमध्ये आम्ही आमच्या अनेक पिढ्या गमावल्या आहेत. गांधी कुटुंबाने पंजाब जाळला… एक शीख म्हणून माझ्या या वेदना आहेत. मी पहिला शीख आहे, नंतर मंत्री.
ते पुढे म्हणाले, जर गुरपतवंत सिंग पन्नू यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन केले तर तुम्ही काय म्हणाल? आणि माफी तर मल्लिकार्जुन खर्गे यांनी मागितली पाहिजे. त्यांनी हे स्पष्ट केले पाहिजे की, राहुल गांधी आपल्या भाषणात जे काही बोलतात ते योग्य आहे.
हे ही वाचा :
तेलुगू कोरिओग्राफर जानी मास्टरला अटक
ड्रोन मार्फत हेरॉईनची तस्करी, पंजाब पोलिसांकडून ५० कोटींचा मुद्देमाल जप्त !
पाकिस्तान म्हणतो, ३७० कलमाबाबत आम्ही काँग्रेससोबत
रोट्या बनवण्यापूर्वी आलम त्यावर थुंकायचा, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या !