सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यातील ‘पंडित’ म्हणजे विद्वान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टीकरण

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यातील ‘पंडित’ म्हणजे विद्वान

मुंबईत संत शिरोमणी संत रोहिदास जयंतीच्या कार्यक्रमात बोलत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावरून मतमतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत. त्या भाषणात ते म्हणाले होते की, ईश्वर हा सर्वांमध्ये आहे, त्याचे नाव, रूप एकच आहे, कुणीही उच्चनीच नाही पण पंडित लोक जे सांगतात ते खोटे आहे. या वाक्यावरून पंडित म्हणजे ब्राह्मण असा अर्थ काढून त्यावर मते व्यक्त होऊ लागली. पण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले की, सरसंघचालकांनी आपल्या वक्तव्यात पंडित या शब्दाचा उल्लेख केला. पंडित या शब्दाचा अर्थ विद्वान असा आहे. आंबेकर म्हणाले की, सरसंघचालकांनी सांगितले, सत्य हेच आहे की मी सर्व प्राण्यांमध्ये आहे. रूप, नाव काहीही असो. सर्वांची योग्यता एक आहे, कुणीही उच्चनीच नाही. पण शास्त्रांचा आधार घेत काही पंडित अर्थात विद्वान जाती आधारित जे बोलले जाते ते खोटे आहे. यातील पंडित या शब्दाचा अर्थ विद्वान असा आहे, असे सुनील आंबेकर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

कसबा, चिंचवडसाठी भाजपाचे शक्तीप्रदर्शन; रासने, अश्विनी जगतापांनी भरले अर्ज

स्वतःचे नाव बदलून हिंदू मुलीचे केले धर्मांतर

नाना पटोलेंना आडव्या गेलेल्या मांजरीला कार्यकर्ते आडवे गेले!

पोलिस अँब्युलन्समधून आले, बदनाम वस्तीत शिरले आणि…

सरसंघचालक मोहन भागवत यांनी संत रोहिदास यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करताना सांगितले की, आपल्या समाजातून जाच होत असतानाही त्यांनी तो सहन केला. कल्याण बुद्धीने घरचे लोक विरोध करत असतानाही त्यांनी बाणा सोडला नाही. उपेक्षा पाहात असताना मनात त्यांच्या विचार आला की, मला सत्य शोधले पाहिजे. शाश्वत चुकांचे निधान आहे का हे प्रत्यक्ष पाहीन. रामानंदाच्या संगतीत पाहिले. ते प्राप्त केले. सत्य हाच ईश्वर आहे. ते सत्य हेच की ई्श्वर सर्वाभूती आहे, रूप नाम, एकच आहे. आपेलपणा सगळ्यांप्रती आहे. कुणीही उच्चनीच नाही. शास्त्राचा आधार घेत पंडित लोक जे सांगत असतात ते खोटे आहे. जाती जातीच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेत, उंचनीचतेच्या भोवऱ्यात अडकून आपण भ्रमिष्ट झालो आहोत. हा भ्रम दूर करायचा आहे.

Exit mobile version