२६ मे रोजी, ओपइंडियाने २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पहिल्या पाच टप्प्यांत १९.४ कोटी मतदार कमी झाल्याचा दावा करण्यासाठी ‘द वायर’ने दिशाभूल करणारा डेटा कसा वापरला, हे उघड केले होते. ‘द वायर’ने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मतदान झालेल्या मतदारसंघांसाठी एकूण नोंदणीकृत मतदारांची संख्या वापरली आणि चालू सार्वत्रिक निवडणुकीतील पहिल्या पाच टप्प्यांसाठी प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांची संख्या वापरली.
परिणामी, वायरने दावा केला आहे की, २०१९मध्ये पहिल्या पाच टप्प्यांमध्ये ७० कोटी मते मिळाली आहेत आणि २०२४च्या निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांमध्ये अवघी ५०.७ कोटी मतदारांनी मतदान केले. प्रत्यक्षात ४८.५ कोटी मतदारांनी गेल्या निवडणुकीत पहिल्या पाच टप्प्यांत मतदान केले होते. वायरने २०१९मधील एकूण मतदारांची २०२४मधील वास्तविक मतांशी तुलना केली आणि मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात कमी झाली, असे म्हटले.
खोटे उघड झाल्यानंतर, ‘द वायर’ने त्वरित लेख बदलला आणि असा दावा केला की सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १.८ कोटी मतदार कमी झाले आहेत. चुकीच्या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी २०१९ साठी एकूण पात्र मतदारांचा वापर केल्याची नोंद खाली जोडून यूआरएल सह संपूर्ण लेख बदलला आहे. यात केवळ निवडणुकीच्या केवळ पहिल्या टप्प्याची तुलना केली गेली आहे, जेव्हा सहा टप्प्यांचे मतदान आधीच संपले आहे. त्यांनी दावा केला आहे की पहिल्या टप्प्यासाठी मतदानात घट झाली आहे. हादेखील पूर्णपणे चुकीचा निष्कर्ष आहे. २० कोटी कमी मतांबद्दल चुकीची माहिती पसरवण्याच्या उद्देशाने ही जाणीवपूर्वक केलेली गणितीय चूक असू शकते.
हे ही वाचा:
खासदारहत्येमागील सूत्रधार अमेरिकेत पळून गेल्याची शक्यता!
फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी; गंभीर- नारायणचा मास्टरस्ट्रोक
कोलकाता संघावर बक्षिसांचा वर्षाव
मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार
सन २०१९च्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नऊ कोटी १३ लाख ७९ हजार ४०९ जणांनी मतदान केले. त्या तुलनेत २०२४च्या निवडणुकीत ११ कोटी ५२ हजार १०३ जणांनी मतदान केले. हे स्पष्टपणे दर्शवते की पहिल्या टप्प्यात मतदानाची संख्या वाढली आहे, परंतु वायरचा दावा आहे की संख्या कमी झाली आहे.
द वायरचा अहवाल आता म्हणतो, “याचा अर्थ १.८६ कोटी (१,८६,७२,६९४) मतांची घसरण आहे.” होय, त्यांनी कंसात १,८६,७२,६९४ सह १.८६ कोटी मते दिली. नऊ कोटींचा आकडा ११ कोटींपेक्षा खाली कसा जाईल, हे केवळ वायरच सांगू शकते. प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यात १.८६ कोटी मतदारांची वाढ झाली.
सन २०१९च्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९१ जागा होत्या, तर सध्याच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १०२ जागांचा समावेश होता. त्यामुळे मतांची संख्या जरी वाढली असली तरी त्यामुळे मतदानात वाढ होण्याची शक्यता नाही.
कोणत्याही परिस्थितीत, वेगवेगळ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये टप्प्याटप्प्याने मतदानाची तुलना करणे हा पूर्णपणे निरर्थक बाब आहे. कारण प्रत्येक निवडणुकीत एकाच मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होत नाही.
सन २०१९मध्ये पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील सर्व २५ जागांसाठी निवडणुका झाल्या, परंतु सध्याच्या निवडणुकांदरम्यान, २५ जागांसाठी चौथ्या टप्प्यात मतदान झाले. तामिळनाडूतील सर्व मतदारसंघांमध्ये सध्याच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात मतदान झाले, पण त्याच मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात गेल्या वेळी मतदान झाले. याचा अर्थ, वेगवेगळ्या निवडणुकांतील प्रत्येक टप्प्यात केवळ जागांची संख्याच नाही, तर जागांची रचनाही पूर्णपणे भिन्न असते. शिवाय, इतर सार्वत्रिक निवडणुकांचाही समावेश केल्यास टप्प्यांची संख्याही वेगळी असते.