जम्मू काश्मीर बदलतंय, वर्षभरात पर्यटकांची लाट!

गेल्या वर्षभरात दोन कोटींहून अधिक पर्यटकांची जम्मू-काश्मीरला भेट

जम्मू काश्मीर बदलतंय, वर्षभरात पर्यटकांची लाट!

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील वाढणारे पर्यटन हे बदलाचे जिवंत उदाहरण आहे.ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात दोन कोटींहून अधिक पर्यटक केंद्रशासित प्रदेशात आले आहेत.डॉ जितेंद्र सिंग म्हणाले पुढे म्हणाले की, येथील दहशतवाद कमी झाल्यामुळे हा बदल झाला असल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वी वाढत्या दहशतवादामुळे फारसे पर्यटक काश्मीरमध्ये येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.या आरोपावर डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, योग्य वेळी निवडणुका होतील असे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अनेकदा स्पष्ट केले आहे.निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचा दाखला देत ते म्हणाले, “आता सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत आणि गृहमंत्र्यांनीही हे सांगितले आहे. भाजपला निवडणुका घ्यायच्या नसल्याचा आरोप अजूनही काँग्रेस करत असेल, तर ते आता कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील?

हे ही वाचा:

पोलिसांनी आता दांडा नव्हे तर डेटाच्या आधारे काम करावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राममंदिरासाठी ११ कोटी

भारताच्या कठोर भूमिकेमुळे मालदीव उच्चायुक्तांची धावाधाव!

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित, विराटचे पुनरागमन

मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की, आधीच्या सरकारांनी तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे तेथील जनतेला विकासापासून वंचित ठेवले.दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद कमी झाल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत भर पडल्याचे दिसून येते.

Exit mobile version