उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची आठवण काढली.नुकत्याच संपलेल्या विश्वचषकाचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, क्रिकेट विश्वचषकात भाऊ मोहम्मद शमीने केलेला अद्भुत पराक्रम संपूर्ण जगाने पाहिला आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्र सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू असतानाच उर्वरित टप्प्यातील मतदानासाठी राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी(१९ एप्रिल) उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे एका विशाल जनसभेला संबोधित केले.यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचे कौतुक केले.तसेच विरोधकांवर जोरदार टीका केली.
हे ही वाचा:
मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आला सीआरपीएफ जवान!
प. बंगालच्या कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान दगडफेक
‘आप’ आमदार अमानतुल्लाह खान यांच्या अटकेचे वृत्त खोटे; चौकशीनंतर दिले सोडून!
चीनच्या ‘तिसऱ्या डोळ्या’ला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अमरोहा फक्त ढोलक वाजवत नाही तर देशाचा ढोलही वाजवतो.क्रिकेट विश्वचषकात भाऊ मोहम्मद शमीने केलेला अद्भुत पराक्रम संपूर्ण जगाने पाहिला आहे.क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्र सरकारने त्यांना अर्जुन पुरस्कार दिला आहे.योगीजींचे सरकार येथे तरुणांसाठी स्टेडियम बांधत आहे.भाजपच्या विश्वकर्मा योजना आणि मुद्रा योजनेचा लाभ देखील येथील लोक घेत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचे नाव न घेता निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पुन्हा एकदा यूपीमध्ये दोन राजकुमारांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या दोन राजकुमारांचा चित्रपट यापूर्वीच नाकारण्यात आला आहे. प्रत्येक वेळी हे लोक घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाची टोपली घेऊन उत्तर प्रदेशातील लोकांकडुन मते मागायला निघतात.