विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून वगळल्याबद्दल आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले की, ‘संपूर्ण देश तिच्यासोबत आहे’. आरोग्य मंत्री म्हणाले, “हा एक राष्ट्रीय प्रश्न आहे, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. हे दुर्दैव आहे की, आपण पक्ष आणि विपक्ष मध्ये याची विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलम्पिकमध्ये सुरवातीपासूनच चांगली कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली होती. देशाला गोल्ड मेडल मिळणार याची संपूर्ण देशाला आशा होती. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी विनेशचे १०० ग्रॅम वजन अधिक आढळून आल्याने तिला बाद करण्यात आले. विनेश अंतिम सामना खेळण्यापूर्वीच बाद झाल्याने संपूर्ण देशाला एकच धक्का बसला. विनेशने ५० किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. यामध्ये तिचे १०० ग्रॅम वजन वाढले आणि तसे नियमांनुसार तिला पुढचा सामना खेळता येत नाही. म्हणून तिला बाद करण्यात आले.
मात्र, विनेशला ऑलम्पिकमध्ये बाद करण्यात आल्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तसेच देशातील अनेक लोकांनी याकडे राजकीय दृष्टिकोन असल्याचे म्हटले. यावरून अनेकांनी पोस्ट शेअर करत सत्ताधाऱ्यांवर बोट केले. लोकसभेत, राज्यसभेत तसेच अनेक राज्यात हा मुद्दा उठला. यावर सत्ताधाऱ्यांनी उत्तर देत, नियमांपुढे कोणीही जात नसल्याचे सांगितले. मात्र, तरीही विरोधक वायफळ बडबड करत देशामध्ये चुकीचा संदेश देत आहेत. अखेर यावर आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करून विरोधकांची कानउघाडणी करत सुनावले.
हे ही वाचा:
बांगलादेशी भारतात घुसत होते, सीमासुरक्षा दलांनी रोखले
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ७० औषधे होणार स्वस्त
कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत; शिस्तभंगाचा आरोप करत पॅरिस सोडण्याचे आदेश
कुस्तीपटू विनेश फोगाटचा कुस्तीला रामराम!
जेपी नड्डा म्हणाले की, विनेश फोगाटचा विषय हा सत्ताधारी आणि विरोधकांचा विषय नसून देशाचा प्रश्न आहे, आणि संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. भारतीय खेळाला पुढे नेण्याचा हा भावनात्मक विषय आहे. पंतप्रधान मोदींनी काल त्यांना ‘चँपियन्स ऑफ चँपियन्स’ म्हणाले पंतप्रधानांचा आवाज हा १४० कोटी लोकांचा आवाज आहे. दुर्दैवाने आपण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात याची विभागणी करत आहोत. दुर्दैवाने, विरोधकांकडे असा कोणताही ठोस मुद्दा नाही ज्यावर त्यांना चर्चा करायची आहे ज्यासाठी सत्ताधारी पक्ष तयार आहे. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, भारत सरकार, क्रीडा मंत्रालय आणि IOC ने सर्व मंचांवर निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भावनांवर ताबा ठेवून आपल्या विवेकाने काम करण्याची आवश्यकता आहे. मी आशा करतो की, विरोधक या दृष्टीने बघेल, असे नड्डा म्हणाले.