राहुल गांधींना ‘उभे’ राहण्याचीही शिस्त नाही का?

संसदेतील छायाचित्रामुळे राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींना ‘उभे’ राहण्याचीही शिस्त नाही का?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात, यावेळी ते त्यांच्या एका छायाचित्रामुळे चर्चेत आहेत. राहुल गांधी यांच्या मातोश्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. त्याच्या शपथग्रहण सोहळ्यानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह काढलेल्या छायाचित्रातून राहुल गांधी यांची बेफिकीरी समोर आली.

जगदीप धनखड यांच्यासह हे छायाचित्र काढण्यात आले त्यात सोनिया गांधी, सोनिया गांधींचे जावई रॉबर्ड वड्रा, प्रियांका वड्रा, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरीवंश नारायण सिंह, राज्यसभेतील भाजपाचे नेते पियुष गोयल हेदेखील उपस्थित होते. राहुल गांधी हे उपराष्ट्रपती धनखड यांच्या मागे उभे आहेत मात्र ते धनखड यांच्या खुर्चीवर हात ठेवून अगदी घरात एखादे छायाचित्र काढत असल्याप्रमाणे उभे असल्यामुळे लोकांनी त्यावर टीका केली. त्यातच बाकी सगळ्यांनी योग्य वेशभूषा केलेली आहे. प्रियांका वड्रा या साडीत आहेत सोनिया गांधी यादेखील साडीत आहेत तर रॉबर्ट वड्रांनी सूट परिधान केला आहे. मात्र राहुल गांधी हे नेहमीप्रमाणे टीशर्टमध्ये आहेत.

हे ही वाचा:

म्हणे प्रपोगंडा फिल्म… ‘द केरळ स्टोरी’ प्रसारणाला विजयन यांचा विरोध

हेमंता बिस्वा सरमा यांनी दिली इंडियन एक्सप्रेसला नोटीस

काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध!

मोदी सरकारच्या सॉवरेन गोल्‍ड बॉन्‍ड योजनेचा राहुल गांधींकडून लाभ

त्यावर सोशल मीडियात अनेकांनी थट्टा उडविली. दर्शन पाठक नावाच्या एका व्यक्तीने म्हटले आहे की बघा राहुल गांधी यांच्याकडे. त्यांना शिस्त नाही, वागण्याची पद्धत नाही. केवळ उभे राहायला सांगितले म्हणून ते उभे राहिलेले दिसतात.

तपाशीष चक्रवर्तीने म्हटले आहे की, आपल्या पुढे उपराष्ट्रपती धनखड बसलेले आहेत याचेही भान राहुल गांधींना नाही. त्यांच्या खुर्चीवर रेलून ते उभे आहेत. संसदीय पदांवर असलेल्या व्यक्तींसोबत छायाचित्र घेतानाही जो शिष्टाचार पाळला पाहिजे, तोही राहुल गांधी पाळू शकत नाहीत.

 

Exit mobile version