भिंतीला हिरवा रंग, फुले-चादर चढवली, भाजपा खासदार मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर दिला भगवा रंग!

पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना

भिंतीला हिरवा रंग, फुले-चादर चढवली, भाजपा खासदार मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर दिला भगवा रंग!

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत एका भिंतीवर हिरवा रंग देत फुले, अगरबती आणि चादर चढवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना समोर येताच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या घटनेची दखल घेत भिंतीला दिलेल्या हिरव्या रंगावर भगवा रंग दिला. सोशल मिडीयावर पोस्टकरत त्यांनी हिंदू समाजाला सजग राहण्याचे आवाहन केले आहे.

सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेजवळील एका गल्लीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. याठिकाणी भिंतीला हिरवा रंग देत त्यावर फुले, हार, अगरबत्ती त्यावर चादर चढवलेले निदर्शनास आले. याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले.

या घटनेची शहानिशा करण्यासाठी भाजपाच्या मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी स्थानिक नेते संग्राम पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव, आणि दातेरे यांच्यासोबत भिंतीला दिलेल्या हिरव्या रंगावर भगवा रंग चढवला.

हे ही वाचा : 

दक्षिण कोरियाच्या विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू!

ज्वेलर्स मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या कटात संपादक 

अझरबैजानच्या विमान अपघाताबद्दल पुतीन यांनी मागितली माफी

‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला सोलापुरातून प्रारंभ!

मेधा कुलकर्णी यांनी सोशल मिडीयावर पोस्टकरत म्हटले, काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याचे व्हाट्सअप व्हायरल झाले. मी आज आवर्जून त्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी गेले. आधी खात्री करून घेतली आणि मग श्री संग्राम ढोले पाटील, संकेत मेहंदळे, यशपाल जाधव आणि दातेरे यांच्या समवेत हिरवा रंगावर भगवा रंग असा चढवला की मजा आली.

त्या पुढे म्हणाल्या, पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले आहेत. आधी छोटेखानी स्वरूप असलेले असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जात आहेत. आपण सतर्क राहूया. माझी सर्वांना एकच विनंती आहे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया, असे मेधा कुलकर्णी यांनी म्हटले.

 

 

Exit mobile version