महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन वेळा लांबणीवर पडलेल्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची प्रतिक्षा आता संपलेली आहे. या महामार्गातून आपली समृद्धी कधी होणार याची वाट बघणारे नागरीकही हा मार्ग अखेर कधी सुरू होणार अशी विचारणा करू लागले आहेत. सर्वांच्याच प्रतिक्षेला विराम देताना नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्ग १५ ऑगस्टला सुरू होणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कुर्ल्यात मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेल्या एका सत्कार समारंभात घोषणा केली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत नागपूर- मुंबई दरम्यान ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गाची घोषणा केली होती. फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वाला नेण्याची आयती संधी मविआ सरकारला मिळालेली होती. परंतु तारीख पे तारीखमध्ये अडकलेल्या मविआ सरकारला अचानक पाय उतार व्हावे लागले. यापूर्वीच्या सरकारकडून ऑक्टोबर २०२१, ३१ डिसेंबर २०२१ आणि आता ३१ मार्च २०२२ ही तारीख देण्यात आली होती. अखेर ज्यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली त्या देवेंद्र फडणवीस यांचे हे स्वप्न आता नव्या शिंदे सरकारच्या काळात तडीस जाण्यासाठी आता काही दिवसांचीच प्रतीक्षा शिल्लक राहिलेली आहे.
नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गावरील वाहतूक १५ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. राज्याच्या विकासासाठी हा गेम चेंजर ठरणार आहे.
हा महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यांतून जातो, मात्र त्याचा फायदा २४ जिल्ह्यांना होणार आहे. त्यावेळी त्याच्या पूर्णत्वाची प्रस्तावित तारीख ऑक्टोबर २०२१ अशी निश्चित करण्यात आली होती. परंतु भूसंपादन, कोरोना लॉकडाऊन अशा अनेक अडचणींमुळे आतापर्यंत नागपूर-शिर्डी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम एकूण १६ टप्प्यात सुरू असून, नागपूर-मुंबई महामार्गावर ७०१ किमी लांबीची एकूण १,६९९ छोटी-मोठी बांधकामे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यापैकी सुमारे १,४०० बांधकामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित बांधकाम वर्षभरात पूर्ण होईल असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात कट रचल्याप्रकरणी पीएफआय सदस्याला अटक
मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम २४ तास सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना दणका; ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती
ठाणे शहराला अतिरिक्त पाण्यासाठी मंजुरी
पुढील वर्षी मुंबई-नागपूर महामार्ग सर्वसामान्यांसाठी उपलब्ध
शिंदे म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारने ते सुरू करण्याची तीन वेळा घोषणा केली होती. प्रत्येक वेळी ती पुढे ढकलण्यात आली. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग १५ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला होणार आहे. याशिवाय मुंबई-शिर्डी महामार्गाचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी मुंबई-नागपूर महामार्ग सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे.