दरड कोसळून गाव भुईसपाट

चार जण ठार

दरड कोसळून गाव भुईसपाट

मुसळधार पावसामुळे गावावर दरड कोसळून चार जण ठार झाल्याची घटना रायगड जिल्ह्यात गुरुवारी घडली. खालापूर येथील चौक जवळील इर्शाळ गडाचा भाग पायथ्याशी असलेल्या वाडीवर कोसळला. त्यात १७ घरे जमीनदोस्त झाली. अनेक जण अजूनही या राड्यारोड्याखाली अडकण्याची भीती आहे, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) अधिकाऱ्यांनी दिली.

घटनेबाबत समजताच एनडीआरएफची दोन पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावमोहीम सुरू केली. आतापर्यंत २२ जणांची सुटका करण्यात आली आहे. ‘आतापर्यंत आम्ही २२ जणांची सुटका केली आहे. अनेक जण अजूनही अडकण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिस असे सुमारे १००हून अधिक जण बचावमोहिमेत कार्यरत आहेत. आम्हाला एनडीआरएफ, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांचेही साह्य मिळत आहे, ’ अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली.

हे ही वाचा:

तर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते…

भारत- पाकिस्तान लढत २ सप्टेंबरला

वाशिष्ठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, चिपळुणात अतिवृष्टी

जगविख्यात मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन

दरड कोसळळ्याने १७ घरांचे नुकसान झाले असले तरी त्यात नेमके किती लोक अडकले आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी येऊन बचावमोहिमेचा आढावा घेतला. उदय सामंत आणि दादा भुसे हे मंत्रीही घटनास्थळी दाखल झाले होते.

Exit mobile version