शरद पवारांच्या पत्रकारांबद्दलच्या भूमिकेचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल !

भाजपकडून विरोधकांना प्रत्युत्तर

शरद पवारांच्या पत्रकारांबद्दलच्या भूमिकेचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल !

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.त्यानंतर बावनकुळे यांनी या क्लिपबाबत स्पष्टीकरण देऊन मागील काळात शरद पवार यांनी पत्रकारांना कशी वागणूक दिली याचा व्हिडिओ शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी (२४ ऑगस्ट) अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बावनकुळे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन केलं.यावेळी पत्रकारांबाबत केलेलं भाष्य जोरदार व्हायरल झालं.त्यात बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर टीका झाली होती त्यांनतर भाजप महाराष्ट्र ने पवारांचा व्हिडिओ जारी करत त्यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा:

काश्मीरवरील पाकच्या अतिक्रमणाबाबत जीनिव्हामध्ये निदर्शने !

२६/११ हल्ला प्रकरणात चौथे पुरवणी आरोपपत्र दाखल, कॅप्टन तहव्वूर हुसैन राणाचा आरोप पत्रात उल्लेख

भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !

भाजपकडूनही शरद पवारांचा व्हिडिओ व्हायरल
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्हायरल क्लिपवरून विरोधकांनी टार्गेट केलं. त्यानंतर महाराष्ट्र भाजपाकडून शरद पवारांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.यामध्ये शरद पवार पत्रकारांशी वाद घालताना दिसत आहेत.भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्यावर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या पिताश्रींचा हा व्हिडिओ जरा नजरेखालून घालावा. शरद पवार साहेब पत्रकारांचे आदरातिथ्य कसे करतात बघा? स्पष्ट आणि रोखठोक प्रश्न विचारला की, पत्र परिषदेतून पत्रकारांना निघून जाण्यास सांगणे, त्यांना अपमानित करणे हीच पवार साहेबांची परंपरा आहे. मा. बावनकुळे साहेबांनी पत्रकारांना असे अपमानित कधी केले नाही. सुप्रियाताई, तुम्ही कोणत्या परंपरेच्या वाहक आहात ?, अशा प्रकारचे ट्विट महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version