आता तुम्हीच आमचे रक्षण करा!

संदेशखालीतील पीडित महिला पोचल्या राष्ट्रपतींकडे

आता तुम्हीच आमचे रक्षण करा!

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील पीडित महिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची शुक्रवारी(१५ मार्च) भेट घेतली.यामध्ये पाच महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे.टीएमसी नेता शाहजहान शेखने आपला कसा वापर केला याची माहिती या महिलांनी राष्ट्रपतींना दिली.तसेच राज्यसरकार आणि बंगाल पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्यास कसा विलंब केला हे राष्ट्रपतींना सांगितले. दलित आणि आदिवासीयांच्या हिताच्या रक्षणासाठी आपण दखल घ्यावी, अशी मागणी पीडित महिलांनी राष्ट्रपतींकड़े केली.

एससी-एसटी सपोर्ट अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.पार्थ बिस्वास म्हणाले की, पीडित महिलांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.पीडित महिलांचे संपूर्ण म्हणणे राष्ट्रपतींनी एकूण घेतले.संदेशखाली येथील एकूण ११ जण ज्यामध्ये ६ पुरुष आणि ५ महिला होत्या त्यांनी आपल्या व्यथा राष्ट्रपतींसमोर मांडल्या.बंगालमध्ये दलित आणि आदिवासीयांचा छळ होत असल्याचे पिडीतांनी राष्ट्रपतींना सांगितले.आमच्या संरक्षणासाठी तुम्ही हस्तक्षेप करावा, अशी मागणी पीडित महिलांनी केली, असे डॉ.पार्थ बिस्वास यांनी सांगितले.

हे ही वाचा..

अनेक कुलकर्णी मुंबई संघात येतील पण धवल कुलकर्णी सारखे कोणी नाही

ड्रोन हल्ल्यावर तेलंगणा पोलिसांचे ‘गरुड’ ठेवणार तीक्ष्ण नजर!

इलेक्टोरल बाँड्सचे सर्वात मोठे खरेदीदार फ्यूचर गेमिंगचे सँटियागो मार्टिन

मुंबई: १९ वर्षीय नोकराने आपल्या मालकिणीचा गळा घोटला!

निवेदनाद्वारे पिडीतांनी आवाहन केले की, संदेशखाली येथील दुर्बल घटकातील लोकांवर अत्याचार झालेल्या प्रकरणात आपण तातडीने हस्तक्षेप करावा.आम्हाला सर्व कुटुंबियांना ज्या वेदना सहन कराव्या लागत आहेत, ते वर्णन करता येणार नाही.आम्हाला परिसरात राहणे अत्यंत कठीण झाले आहे.आपण यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे आहे जेणेकरून आमचे संरक्षण होईल.

पिडीतांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तुम्ही देशातील न्याय आणि समतेचे रक्षक आहात.तुम्ही देशातील शोषित आणि दुर्बल घटकांसाठी न्यायाच्या आशेप्रमाणे आहात.या प्रकरणात तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला न्याय मिळू शकतो ,असा विश्वास वाटतो, असे पिडीतांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version