यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडणार आहे. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीच्या आज (४ जुलै) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘सरहद’ या संस्थेकडून या संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संस्थेने २०१४ साली पंजाबमधील घुमान येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. विशेष म्हणजे तब्बल ७ दशकानंतर प्रथमच मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे.
आगामी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी सात ठिकाणाहून प्रस्ताव आले होते. त्यानंतर साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. स्थळ निवड समितीने सादर केलेल्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा होऊन आगामी साहित्य संमेलन दिल्लीला घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
हे ही वाचा..
मध्य प्रदेशात मंदिरालगतची भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू
नारायणपूरमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २ आयईडी बॉम्ब जप्त !
पुणे जिल्ह्यातील प्रशासनाने सतर्क राहावे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय देखील पूर्ण भरले
मिळालेल्या माहितीनुसार, हे संमेलन पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम किंवा दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील यासारख्या ठिकाणीच आयोजित करण्याची माहिती आहे. दरम्यान, ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित करण्यात आले होते.