या महिन्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा ‘विविधतेत एकता’ हा उत्सव साजरा करणार आहे. सेवा मोहिमेचा भाग म्हणून हा उत्सव देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून पंधरा दिवस साजरा करण्यात येतो. भाजपा या पंधरा दिवसांत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करते. या उपक्रमासंदर्भात अरुण सिंह यांनी राज्यांना एका पत्राद्वारे सुचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘नमो’ या अॅपवर या उपक्रमांचा तपशील भरण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना पक्षाकडून देण्यात आले आहेत. यातील पाच उत्कृष्ट युनिट्सला पुरस्कार दिला जाणार आहे. येत्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस आहे. ही मोहीम १७ सप्टेंबरला मोदींच्या वाढदिवसादिवशी सुरू होईल आणि २ ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीदिनी संपणार आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार
मदरशातून देशविरोधी कृत्य झाले तर याद राखा
गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला
सचिननंतर मुंबईत विराटही सुरू करतोय रेस्टॉरन्ट
भाजपा वृक्षारोपण मोहीम, दिव्यांग व्यक्तींमध्ये उपकरणे वाटप, स्थानिक उत्पादनांची जाहिरात आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहीम आणि जलसंधारणासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून २ ऑक्टोबला महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाजपा कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांना खादी आणि स्थानिक उत्पादने वापरण्याचे आवाहन केले आहे.