आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी मागील वायएसआर काँग्रेस (वायएसआरसीपी) सरकारवर गंभीर आरोप केला आहे. वायएसआर काँग्रेसच्या काळात श्री व्यंकटेश्वर मंदिरात ‘प्रसाद’ म्हणून दिले जाणारे तिरुपती लाडू बनवण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि निकृष्ट घटकांचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यावरून देशभरात वातावरण पेटले असून आता या आरोपांची दखल केंद्र सरकारने घेतली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी तिरुपती लाडू प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवला आहे. सरकार या प्रकरणाची अधिक चौकशी करून योग्य ती कारवाई करेल, असे आश्वासन नड्डा यांनी दिले आहे. जेपी नड्डा म्हणाले की, “मला या प्रकरणाची बातमी मिळताच मी चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोललो आणि त्याबद्दल माहिती घेतली, मी त्यांना त्यांच्याकडे असलेला अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. मी त्याची चौकशी करेन आणि राज्य नियमकाशी देखील बोलेन आणि त्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेईन. अहवालाची सखोल चौकशी केल्यानंतर, कायद्यानुसार आणि आमच्या FSSAI च्या कक्षेत येणाऱ्या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.”
अमरावती येथे एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, वायएसआरसीपी सरकारने जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरात लाडू बनवताना निकृष्ट घटकांचा वापर केला होता. शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती. नायडू पुढे म्हणाले की, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे आणि मंदिरातील सर्व गोष्टींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे गुणवत्ता सुधारली आहे. मात्र, वायएसआरसीने नायडू यांचे आरोप साफ फेटाळून लावले आहेत.
हे ही वाचा :
राऊत म्हणतात, लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्यामुळेचं काँग्रेसच्या जागा वाढल्या
आता दंगल केलीत तर भरून द्या! उत्तराखंडमध्ये कायदा
महागाई कुठे आहे? आयफोन खरेदीसाठी लागल्या रांगा
माजी प्राचार्य संदीप घोष आता नावापुढे डॉक्टर लावू शकणार नाहीत !
आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या अमरावती येथे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, वायएसआरसीपी सरकारने जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरात लाडू बनवताना निकृष्ट घटकांचा वापर केला होता. शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती. नायडू पुढे म्हणाले की, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे आणि मंदिरातील सर्व गोष्टींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे गुणवत्ता सुधारली आहे. मात्र, वायएसआरसीने नायडू यांचे आरोप साफ फेटाळून लावले आहेत.