देशात बेरोजगारी वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असल्याची ओरड किती बिनबुडाची आहे. खोटी आहे हे आता एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. भारतामधील बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून २०२३ मध्ये ९.६ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांपर्यंत हा दर आला आहे. यावरून देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
हेही वाचा..
इंडिगोचे उड्डाण, जगातील टॉप १० मध्ये!
ज्ञानवापी मशीद प्रकरणात मुस्लिम पक्षाला दणका; याचिका फेटाळल्या
मध्य प्रदेश विधानसभेतील नेहरुंचे चित्र काढून डॉ. आंबेडकरांचे चित्र लावले
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अडवाणी, मुरली मनोहर जोशींना रितसर निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात राबण्यात येत असलेल्या विविध योजना, रोजगार निर्मितीबद्दल करण्यात येत असणाऱ्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे चित्र आहे. नुकताच पिरीओडिक लेबर फोर्स सर्व्हेचा अहवाल प्रसिद्ध झाला असून यामध्ये २००१ मध्ये ६.८, २०११ मध्ये ९.६ तर २०२३ मध्ये ३.२ टक्क्यापर्यंत बेरोजगारीचा दर घसरलेला असल्याचे दिसून आले आहे. या सर्व्हेने देशात बेरोजगारी वाढलेली आहे, या आधारहीन विधानांना चोख प्रत्युत्तर देण्याचे काम केले आहे.
देशात वाढत असलेले प्रकल्प, विविध उद्योग व्यवसायाला मिळत असलेली चालना यामुळे देशात अनेक हातांना काम मिळत आहे. परिणामी देशातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जगभारत एकीकडे आर्थिक मंदीचे चित्र असताना भारत या सगळ्या अडथळ्यावर मात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशाची आर्थिक प्रगती केली आहे, त्याची वाहवा आज जगभरात होत आहे. देशाचा वाढणारा विकास दर हे त्याचेच द्योतक आहे. त्यामुळेच देशातील बेरोजगारीचा दर झपाट्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे.