अरेच्चा! बघता बघता ट्रकला रस्त्याने गिळले

पुण्यातील घटना

अरेच्चा! बघता बघता ट्रकला रस्त्याने गिळले

पुण्यात एक विचित्र अपघात घडला असून याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणे महापालिकेच्या ट्रकला अपघात झाला असून हा संपूर्ण ट्रकचं खड्यात अडकल्याचे दिसत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून सध्या अडकलेला ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

पुण्यातला समाधान चौकामध्ये महापालिकेच्या कामासाठी आलेला एक ट्रक उलटाच्या उलटा खड्यात गेला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून यातून चित्र स्पष्ट होत आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

हे ही वाचा : 

आर्थिक संकटात सापडला मालदीव, भारताकडून ५ कोटी अमेरिकी डॉलरची मदत ! 

सांगा, आम्ही चालायचे तरी कसे?

तिरुपती लाडू प्रकरण पोहोचले केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे

मदरशात झाडूच्या सहाय्याने एके ४७ बनवण्याचे प्रशिक्षण!

पुण्यातील सिटी पोस्ट कार्यालय परिसरात महापालिकेचा ट्रक कामासाठी आला होता. या परिसरात मैलापाणी वाहिन्यांबाबत तक्रारी आल्याने महापालिकेकडून संबंधित वाहिन्या दुरूस्तीचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास महापालिकेची मैलापाणी वाहिनी दुरूस्तीसाठीचा ठेकेदाराचा ट्रक आणि कामगार सिटी पोस्ट कार्यालयात पोहचले. कामगारांकडून चेंबरमध्ये काम करण्यास सुरवात झाली होती. त्याचवेळी ट्रक हळूहळू पुढे जात असताना अचानक पुढच्या बाजूने उचलला गेला आणि बघता बघता खाली तयार झालेल्या खड्यात गेला. यामध्ये ट्रकचा केबीनचा भाग वगळता संपूर्ण ट्रक जमीनीत अडकला गेला. यावेळी ड्रायव्हरने चपळाईने ट्रकमधून बाहेर उडी घेत स्वतःचा जीव वाचवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जीवितहानी झालेली नाही. संबंधित ट्रकला बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

Exit mobile version