केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. २०२५ पासून सर्व ट्रक केबिन अनिवार्यपणे वातानुकूलित (एसी) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना केंद्रीय मंत्रालयाने जारी केली आहे. १ ऑक्टोबर २०२५ नंतर नव्या ट्रकमध्ये चालकांसाठी एसी केबिनची सुविधा दिली जाईल.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे सांगण्यात आले आहे की, १ ऑक्टोबर २०२५ रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेल्या वाहनांमध्ये N2 आणि N3 श्रेणीतील वाहनांच्या केबिनसाठी वातानुकूलित यंत्रणा बसवली जाईल.
जुलैमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते की, ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन यंत्रणा अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या अधिसूचनेला मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
साडेतीनशे कोटींचं घबाड सापडण्यापूर्वी काँग्रेस खासदार साहू काळ्या पैशाने होते व्यथित
महाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक
अमेरिकेत भारतवंशी जाणून घेणार राम मंदिराचा संघर्ष
नितीन गडकरी म्हणाले होते की, “ट्रक ड्रायव्हर्स वाहतूक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतात, जे भारतासाठी सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि त्यांच्या कामाच्या परिस्थिती आणि मानसिक स्थितीशी संबंधित समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ट्रकसाठी लवकरच वातानुकूलित केबिन अनिवार्य करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले होते. ट्रक चालकांना प्रचंड उष्णतेच्या परिस्थितीत काम करावे लागत असल्याची व्यथा मांडत केंद्रीय मंत्री म्हणाले की, आपण ट्रक चालकांसाठी वातानुकूलित केबिनसाठी बराच काळ दबाव टाकत आहोत, तर काहींनी यावर आक्षेप घेतले होते, यामुळे खर्चात वाढ होईल,” असे ते म्हणाले.