उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी यांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. आता अंमलबजावणी संचालनालयाने त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस त्यांच्या कानपूर येथील निवासस्थानी पोहोचले असून ईडीच्या पथकाने त्याच्या घरी छापा टाकला आहे.दरम्यान, आमदार इरफान सोलंकी आणि त्याचा भाऊ रिजवान हे दोघे जाळपोळ, गुंडगिरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात आधीच तुरुंगात कैद आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाच वाजता ईडीचे पथक समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी यांच्या घरी पोहोचले.इरफान सोलंकीसह त्याचा भाऊ आणि इतर नातेवाईकांच्या घरावरही ईडीचे छापे सुरू आहेत.पथकाकडून सर्वांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून तपास सुरु आहे.
हे ही वाचा :
एडनच्या आखातात येमेनच्या हौती बंडखोरांकडून क्षेपणास्त्रहल्ला; दोघांचा मृत्यू
‘राजकीयदृष्ट्या पक्षपाती निर्णय कधीच दिला नाही’
पोलिसभरती पेपरफुटी प्रकरणी सात जणांना अटक!
ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी सहा वाहनांसह इरफान सोलंकीच्या घरी पोहोचले.ईडीकडून त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ईडी इरफान सोलंकीच्या बेनामी संपत्तीची चौकशी करत आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, इरफान सोलंकी सध्या यूपीच्या महाराजगंज तुरुंगात बंद आहे.इरफान सोलंकी याच्यावर खंडणी,जमीन बळकावणे अशा इतर संबंधित सुमारे १७ गुन्हे दाखल आहेत.कानपूरमधील जजमाऊ येथील डिफेन्स कॉलनी येथील नजीर फातिमा यांच्या घराला आग लावण्याचा आरोप सपा आमदारावर आहे.जमीन हडपण्यासाठी सोलंकी यांनी घराला आग लावल्याचा आरोप पीडितेने केला आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इरफान सोलंकीला डिसेंबर २०२२ मध्ये तुरुंगात पाठवण्यात आले होते.या प्रकरणावर १४ मार्च रोजी निर्णय होणार आहे.