जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळतोय

शेजारी सुरू आहे जेएसडब्ल्यू कंपनीकडून खोदकाम

जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळतोय

रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर तातडीने जिल्हा प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली. दरम्यान केंद्र संरक्षित असलेल्या जयगड किल्ल्याच्या ढासळत असलेल्या बुरुजाचे कारण जाणून घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या पंचांकडून अहवाल प्राप्त झालेला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून किल्ल्याचे बुरुज ढासळत आहेत. यापूर्वी ढासळलेला हा बुरुज सुस्थितीत होता. मात्र शेजारी असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीकडून खोदकाम सुरू आहे. तेथे कंपनीच्या जेट्टीचे काम सुरू आहे, त्यापासून ही परिस्थिती निर्माण झाल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे. समुद्रात साधारणपणे २०० ते २५० मीटर होत असलेल्या ड्रेझिंग आणि ड्रिलिंगमुळे बुरुजाला तडे गेल्याचे अहवालात म्हटलेले आहे. याबाबत भूवैज्ञानिक पुणे आणि पुरातत्त्व विभागाला पाहणी करण्यासाठी पत्र दिले जाणार आहे.

जयगड किल्ल्याचे बांधकाम शेकडो वर्षे जुने आहे. शिवाय, बुरुजावर झाडे देखील उगवलेली आहेत. त्यामुळे बुरुज ढासळला असावा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. पण त्यानंतर आता समुद्रात सुरू असलेल्या जेट्टीच्या कामामुळे किल्ला ढासळल्याचे पंचांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

दाऊद इब्राहिमच्या भावाच्या मेहुण्याची उत्तर प्रदेशात हत्या!

रिषभ पंत ग्लव्होज काढून आयपीएल खेळणार!

लोकसभा निवडणुकीच्या तारखा १३ मार्चनंतर जाहीर होण्याची शक्यता

केंद्राकडून शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेचे आमंत्रण

किल्ल्याचे संवर्धन आणि जतन झाले पाहिजे. त्यासाठी ठोस पावले तातडीने उचलली जावीत, अशी जोरदार मागणी दुर्गप्रेमी आणि स्थानिकांकडून केली जात आहे. जयगड हा किल्ला केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे देखभालीसाठी देण्यात आलेला आहे.

 

Exit mobile version