एकेकाळी दरोडेखोर राहिलेला आता बनणार चित्त्यांचा ‘मित्र’

'चित्तामित्र' आता घेणार खास पाहुण्यांची काळजी.

एकेकाळी दरोडेखोर राहिलेला आता बनणार चित्त्यांचा ‘मित्र’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतवासियांना ८ चित्ते भेट दिले होते. हे खास चित्ते आफ्रिकेतील नामिबिया देशातून  मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणले गेले. तसेच भारतातील जंगलात तब्बल ७० वर्षानंतर चित्ते फिरणार आहेत. मात्र आता कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते संरक्षणाचे मोठे आव्हान वन खात्यासंमोर उभे राहिले आहे. चित्ता संरक्षणासाठी वन विभागाने ‘चित्ता मित्र’ हे पद निर्माण केले असून, त्यासाठी तेथील स्थानिक गावकरी रमेशसिंह सिकरवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिकरवार हे कुनो राष्ट्रीय उद्यान परिसरात असेलेल्या गावात राहणारे जेष्ठ नागरिक असून एकेकाळी कुप्रसिद्ध दरोडेखोर म्हणून ओळखले जात होते.

रमेशसिंह सिकरवार यांनी दरोडेखोरीचे काम सोडून गावात स्थायिक झाले होते. मात्र त्यांची दहशत अजूनही कायम असून गावातील लोक घाबरत असेल्याने वन विभागाने त्यांना ‘चित्ता मित्र’ ही पदवी दिली. जेणे करून चित्त्यांची शिकार होणार नाही. असा वन विभागाने सांगितले आहे. सिकरवार दरोडेखोरीच्या टोळीने १९८४ च्या दरम्यान पोलिसांनसमोर शरणागती पत्करली होती. सिकरवार हे या टोळीचे प्रमुख होते. त्यांनी एकाच दिवसात १३ गुरख्यांची हत्या केल्याचा गुन्हा सिकरवार याच्या नावावर आहे. तसेच एकूण ९७ गुन्हे सिकरवार यांच्या नावावर दाखल आहेत.

हे ही वाचा:

नवरात्र २०२२: सप्तशृंगी गडावर, देवीचा जागर

सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला माजी खासदार बॅ. नाथ पै यांचे नाव

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएफआय संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी

आणि हेमाची ‘लता’ झाली!

७२ वर्षाचे वयोमान असलेल्या सिकरवार यांना परिसरातील जंगलाची खडानखडा माहिती आहे. जंगलातील ज्ञानामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुनो जंगल परिसरात शिकारीच्या प्रमाणात वाढ झाली असून सिकरवार यांची नियुक्ती केल्याने शिकारीला आळा बसेल, असा विश्वास वन विभागाला आहे.

सिकरवार यांनी कुनो येथील वन्यप्राण्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच वन विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी रात्रीच्या वेळी कुनोच्या जंगलात फारसे लक्ष देत नाहीत. तसेच या जंगलामध्ये ‘मोगिया’ समाजाचे नागरिक राहतात. हे नागरिक शिकारीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. त्यावरच त्यांची उपजीविका चालते. वन अधिकाऱ्याना वन्य प्राण्यांपेक्षा स्वत:च्या जिवाची जास्त काळजी असते. त्यामुळेच ते शिकारी व स्थानिकांशी जास्त हुज्जत घालत नाहीत. अशी माहिती सिकरवार यांनी दिली.

Exit mobile version