मोदी सरकारने २०१९ साली काश्मीरला लागू असलेलं कलम ३७० हटवत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर जम्मू काश्मीर राज्याचं केंद्रशासित प्रदेशात रुपांतर झालं आणि दोन भागांमध्ये हे राज्य विभागलं गेलं. हे कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये बरेच बदल झाले. या निर्णयाविरोधात याचिका देखील दाखल झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय योग्य ठरवला. हा ऐतिहासिक निर्णय कसा घेतला गेला याची कथा आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.
या विषयावर ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमधील दृश्यांनी आणि संवादांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री यामी गौतम ही प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे.
‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला काश्मिरचे खोरे दिसते. नंतर ‘कश्मीर इज अ लॉस्ट केस’ हा यामी गौतमचा डायलॉग असून पुढे कलम ३७० असताना तिकडच्या काही लोकांची विचारधारा कशी होती याची दृश्ये दाखविली आहेत. हा निर्णय कसा घेण्यात आला याची झलकही दाखवण्यात आली आहे. तसेच ट्रेलरच्या शेवटी ‘पूरा का पूरा कश्मीर भारत का हिस्सा था और रहेगा’ हा संवाद आहे.
यामी गौतमने सोशल मीडियावर ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे. ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केलं आहे. हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हे ही वाचा:
समान नागरी कायदा विधेयक उत्तराखंड विधानसभेत मंजूर
‘श्रीकृष्णाने पाच गावे मागितली होती, आम्ही तीन मागतो’
अमेरिकेचा बगदादमध्ये ड्रोनहल्ला इराणसमर्थक दहशतवादी कमांडरसह तिघांचा मृत्यू
मिलिंद देवरांनंतर बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामाराम
यामी गौतमसोबत या चित्रपटात प्रियामणी, अरुण गोविल, वैभव तत्ववादी, अश्विनी कौल, स्कंद ठाकूर, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह आदी कलाकारांची फौज आहे.