उत्तर प्रदेशाच्या बरेली मधील एका मशीदीवर बांधण्यात आलेल्या मिनार तोडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मशीदीवर रातोरात हे बांधकाम करून तीन मिनार उभ्या करण्यात आल्या होत्या. सकाळी जेव्हा लोकांनी मशीदीवर निर्माण झालेल्या मिनार पाहताच हैराण झाले. हिंदू संघटनांनी यावर आक्षेप घेत विरोध केल्यानंतर प्रशासनाने कारवाई करत मशिदीवरील मिनार पाडण्यात आल्या.
बरेली मधील मलकपूर येथील ही घटना आहे. येथील मन्सुरी मस्जीदीवर रातोरात तीन मिनारचे बांधकाम करण्यात आले होते. हिंदू समुदायाच्या लोकांनी हे पाहताच सर्वजण एकवटले आणि निदर्शने केली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने कारवाई करत मिनार पडण्याचे आदेश दिले. कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हे ही वाचा :
हरियाणामध्ये आप, काँग्रेसच्या युतीचे बिनसले; आपकडून उमेदवारांची यादी जाहीर
आरएसएसचे कार्य समजण्यासाठी राहुल गांधींना घ्यावे लागतील अनेक जन्म!
शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा !
‘सनातन धर्म…’ च्या मराठी आवृत्तीचे लालबागच्या राजाच्या दरबारी प्रकाशन
तोडक कारवाई सुरु असताना मौलाना तौकीर रजा खान पक्षाचे लोक घटनेस्थळी दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून कोणाला बोलण्याची संधीच दिली नाही. पोलिसांनी दोन्ही समुदायाच्या लोकांना बसवून समजूत काढून वातावरण शांत केले. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.