८ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या माजी आमदाराच्या मुलीला राष्ट्रवादी शप गटाचे तिकीट!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची तिसरी यादी जाहीर

८ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या माजी आमदाराच्या मुलीला राष्ट्रवादी शप गटाचे तिकीट!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आज (२७ ऑक्टोबर) ९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारांची नावे घोषित केली. आतापर्यंत एकूण ७६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून उर्वरित उमेदवारांच्या नावाची प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी, पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या आजच्या तिसऱ्या यादीमधील सिद्धी रमेश कदम या उमेदवाराची अधिक चर्चा होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. माजी आमदार रमेश कदम यांनी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३१२ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगला आहे.

घोटाळया प्रकरणी रमेश कदम यांनी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ८ वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये ते तुरुंगातून बाहेर पडले होते. जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले होते. गेल्या काही आठवड्यापूर्वी मोहोळमधून उमेदवारी मिळवण्यासाठी रमेश कदम यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. अखेर आजच्या यादीत २६ वर्षीय सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची तिसरी यादी

१. करंजा – ज्ञायक पटणी
२. हिंगणघाट – अतुल वांदिले
३. हिंगणा – रमेश बंग
४. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
५. चिंचवड – राहुल कलाटे
६. भोसरी – अजित गव्हाणे
७. माझलगाव – मोहन बाजीराव जगताप
८. परळी – राजेसाहेब देशमुख
९. मोहोळ – सिद्धी रमेश कदम

हे ही वाचा : 

सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबेल तेव्हाच बंगालमध्ये शांतता नांदेल!

‘पहिल्यांदाच डिजिटल अटकेचा उल्लेख, फसवणूक टाळण्यासाठी पंतप्रधानांनी सांगितले तीन उपाय’

विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्राचा वाटा मोठा!

‘देवेंद्र फडणवीस राजकीय विरोधक, पण वैयक्तिक शत्रू नाहीत’

 

Exit mobile version