बॉम्बे टू गोवा या फिल्ममध्ये बसमध्ये एक चोर अभिनेत्रीची बॅग चोरून फरार होतो. बॅग चोरीला गेलेली हे कळताच चलाख बस ड्रायव्हर आणि चालक परत ही बस मुंबईच्या दिशेने वळवतात. मुंबईच्या दिशेने चाललेल्या या बसमध्ये हा चोर येताच त्याला पकडले जाते. असाच काहीसा किस्सा मिरज-महाबळेश्वर गाडीत घडला. फक्त गाड्या वेगवेगळ्या होत्या एवढंच काहीसा फरक.
किस्सा असा झाला की, सातारा स्थानकातून चोरट्याने चक्क कंडक्टरची तिकीट मशीन लंपास केली. परंतु या चोराच्या काही क्षणातच मुसक्या आवळल्या गेल्या. या चोराच्या मुसक्या महाबळेश्वर आगाराचे चालक आणि वाहक यांच्या दक्षतेमुळे आवळल्या गेल्या. चोरीला गेलेली तिकीट मशीन काही क्षणातच परत मिळवण्यात यश आले.
हा चोरटा ठाणे-कऱ्हाड गाडीतून प्रवास करत होता. सातारा बस स्थानकात गाडी येताच वाहक इंगळे यांची बॅग या चोराने लंपास केली. त्यानंतर हा चोरटा मिरज-महाबळेश्वर या गाडीत बसला. या गाडीत चालक पाटील व वाहक डुबल कामगिरीवर होते. वाहकाने चोरट्याला तिकीट घेण्याची विनंती केली. त्याने वाहकाला माझ्याकडेही तिकीट मशीन आहे, मीही तुला तिकीट देऊ शकतो अशा आशयाचे उत्तर दिले आणि तिकीट घेण्यास नकारघंटा दाखवली.
हेही वाचा :
दोन षटकांदरम्यान वेळकाढूपणा केलात तर ‘शिक्षा’
जेएनयू कॅम्पसमध्ये आंदोलन केले तर २० हजारांचा दंड
महुआ मोइत्रा यांना बंगला रिकामा करण्यास सांगा!
दोन षटकांदरम्यान वेळकाढूपणा केलात तर ‘शिक्षा’
वाहकाला कुछ तो गडबड है दया असा संशय आला. तिकीट मशीन सामान्य माणसाकडे कशी असू शकते, याकरता त्याने चौकशी केली. चोराने जर्किनमधून चोरलेली मशीन दाखवली. वेळ न दवडता तात्काळ वाहकाने वाई येथे पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. स्थानक प्रमुख वाई यांच्याकडे मशीन ताब्यात दिली. वाहक आणि चालकाने दाखवलेल्या या साहसाचे आणि हुशारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.