26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमुघलांच्या 'राष्ट्रनिर्माणाची' मिमांसा

मुघलांच्या ‘राष्ट्रनिर्माणाची’ मिमांसा

Google News Follow

Related

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी कायम चर्चेत राहणारे अभिनेता नसिरुद्दीन शाह हे अलीकडेच एका मुलाखतीत म्हणाले, की मुघल “राष्ट्र निर्माते” होते. त्यांच्या या विधानानंतर नसिरूद्दीन यांच्या विरोधात टीकेची ढोड उठली. पण या त्यांच्या दाव्याची ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे मिमांसा होणे गरजेचे आहे.

“पूर्वी शिवाजी आणि औरंगझेब हे एकमेकांशी लढले, म्हणून पूर्वकाळची वैरे नि लढाया यांची उसनवारी करून, आजच्या काळातही ती वैरे उगवण्यासाठी झगडत राहणे, हे केवळ हास्यास्पदच नव्हे, तर आत्मघातकी ही आहे” असे खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मत होते. (संदर्भ : धनंजय कीर लिखित सावरकर चरित्र, प्रकरण १४, ‘हिंदुत्वाची विचारप्रणाली’)

स्वातंत्र्यवीरांनी म्हटल्याप्रमाणे पूर्वी मुघलांनी केलेल्या अमानवीय कृत्यांना आजचे मुस्लिम जबाबदार नसतीलही, पण ते जर मुघलांना आपले ‘आदरणीय पूर्वज’ म्हणत असतील तर मुघलांनी केलेल्या पापाचेही ते समर्थन करतात, व म्हणूनच त्यांत अप्रत्यक्ष भागीदारही बनतात. भारतातील लक्षावधी हिंदू प्रेक्षकांनी ज्याला उत्कृष्ट कलाकार म्हणून आदर दिला, त्या नसिरुद्दीन शहा याने “मुघल हे राष्ट्रनिर्माते होते” – असे दुर्दैवी वक्तव्य करून आपली ‘खरी ओळख’ (?) जाहीर केली आहे.

ज्याला आपण “वेन्सडे” (Wednesday – चित्रपट) मधील “कॉमन मॅन” समजत होतो, तो नसिरुद्दीन वास्तव जीवनातही “सरफरोश” मधील “गुलफाम हसनच” निघाला! त्या भूमिकेतून तो कधी बाहेर आलाच नाही! नसिरुद्दीनचे हे वक्तव्य म्हणजे हिंदुंच्या भळभळणाऱ्या चिरंतन जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. एवढेच नव्हे तर परकीय मुघलांविरुध्द लढणाऱ्या आमच्या पूर्वजांच्या बलिदानाचा, शौर्याचाही तो अपमान आहे.

मुघलांचा अत्याचारी इतिहास काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी कधीही जनतेसमोर येऊ दिला नाही. तो येणारच नाही याची पुरेपूर काळजी घेतली. पानेच्या पाने मुघल बादशहांचे नसलेले मोठेपण सांगण्यात खर्ची पाडली. शालेय इतिहासापासूनच अकबर,(The Great Mughal) “महान सम्राट” म्हणून आमच्या कानी कपाळी बिंबवला गेला. शिवरायांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेचा इतिहास शालेय इतिहासात जेमतेम दोन चार पानात आटोपला जाई.

मुघल आणि सुलतानांचा काळा इतिहास नव्या पिढीसमोर येऊ नये यासाठी नेहरूंच्या काळापासून, शासकीय पातळीवरही प्रयत्न झाले. “भारतातील मुस्लीम राज्यकर्त्यांच्या कालखंडाची निंदा होता कामा नये. मुस्लीम आक्रमकांनी या देशात मंदिरांचा विध्वंस केला त्याचा कुठेही उल्लेख नसावा.” असा जणू अलिखित नियमच नेहमी पाळला गेला. काँग्रेसी आणि कम्युनिस्ट षडयंत्रामुळे मुघलांचा आणि तत्सम इस्लामिक राजवटींचा अत्याचारी इतिहास कधी समोर आलाच नाही.

हे ही वाचा:

पालिका आयुक्त म्हणतात मुंबईत ‘इतके’ रुग्ण झाले की लॉकडाऊन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

७० वर्षीय नोकराची हत्या, मालकाला अटक

मंदिराच्या दारात लटकवले गोमांस

नसिरुद्दीनने ज्यांना राष्ट्रनिर्माते म्हटले ते मुघल नेमके कसे होते? 

त्याचप्रमाणे, भारतातल्या अन्य मुस्लिम राजवटी खऱ्या कशा होत्या ? याविषयावर छत्रपति शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकदिनी ज्येष्ठ शिवचरित्रकार श्री.गजाजन भास्कर मेहेंदळे यांनी ऐतिहासिक भाषण दिले होते. तसेच, त्यांची एक पुस्तिका – “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर ……” अशा शीर्षकाची आहे. लेखातील पुढील ऐतिहासिक संदर्भ ग.भा. मेहेंदळे यांच्या साहित्यावर आधारित आहेत.

मुघल खरच राष्ट्रनिर्माते होते का?

मुघल दरबारचा इतिहास आणि समकालीन अधिकृत दस्तऐवज बघितले असता असे लक्षात येईल की मुघल “राष्ट्रनिर्माते” तर सोडाच पण साधे मानव म्हणवण्याच्याही लायकीचे नव्हते.

मुघल सत्तेचा संस्थापक मोहम्मद जहीरुद्दीन बाबर याने जेव्हा १५२६ मध्ये ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर कब्जा केला, तेव्हा तेथील भोवतालच्या कड्यावर जैनधर्मीयांच्या मूर्ती होत्या,त्या फोडुन टाकण्याचा हूकूम बाबराने दिला. हे त्याच्या बाबरनामा नावाच्या अधिकृत आत्मचरित्रातच नमूद आहे. कुराणमध्ये लिहिल्याप्रमाणे “हिंदुच्या कत्तली करुन त्यांच्या मुंडक्याचे मिनार रचण्याचे” आदेश बाबराने दिल्याचे त्याच्याच आत्मचरित्रात लिहिलेले आहे. लोकांच्या कत्तली करुन मुंडक्यांचे मिनार उभारल्याची कैक उदाहरणे इस्लामी राज्यकर्त्याच्या इतिहासात सापडतात.

शाहजहानने १६३४ मध्ये लाहोरमध्ये एक गुरुद्वारा पाडून टाकला. औरंगजेब गुजरातचा सुभेदार असतांना १६४५ -१६४६ मध्ये त्याने अहमदाबादमधील सुंदर जैनमंदिर पाडुन टाकले.याचे उल्लेख ‘मिरात ए अहमदी’ या गुजरातच्या फार्सी इतिहासात तसेच ‘तेवनो’ नावाच्या फ्रेंच प्रवाशांच्या प्रवासवृत्तातही सापडतात.

औरंगजेबाने दिल्लीच्या तख्तावर आल्यावर तर हजारो मंदिरे पाडल्याची उदाहरणे आहेत. पंढरपुर येथील विठ्ठलाचे मंदिरही जानेवारी १७०५ मध्ये त्याने उध्वस्त केले होते. राजस्थानातील उदयपुर,जोधपूर आणि जयपूर परिसरात दीड वर्षाहून अधिक काळात ३०० हून अधिक मंदिरे पाडली होती. याचा तपशील “मआसिर ए आलमगिरी” या त्याच्या अधिकृत दरबारी दस्तावेजात आलेला आहे. वरील संदर्भ श्री.गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या “छत्रपति शिवाजीमहाराज झाले नसते तर……” या पुस्तिकेत आलेले आहेत. इस्लामिक ग्रंथ, शरिया आणि समकालीन इस्लामिक कागदपत्रांच्या पुराव्यांचे  तपशीलवार उल्लेख या छोट्याशा पुस्तिकेत सापडतात. माणुस एखाद्या अमानवीय तत्वज्ञानाच्या आहारी गेल्यावर त्याचा सैतान कसा होऊ शकतो,याची कैक उदाहरणे या पुस्तिकेत आढळतात.

भारताच्या इतिहासात ज्याला “महान” / “द ग्रेट” म्हटले जाते, तो अकबर वास्तवात कसा होता? याचेही उदाहरण श्री.गजानन भास्कर मेहेंदळे देतात.
अकबराने इ.स. १५६८ साली जेव्हा चित्तोडचा किल्ला काबीज केला तेव्हा किल्ल्यात ८००० लढवय्ये रजपुत आणि ४०००० हून अधिक शेतकरी होते. या सर्व लोकांची सरसकट कत्तल करण्याचा अकबराने हूकूम दिला. सुमारे ३०००० निरपराध राजपुत आणि शेतकऱ्यांची अकबराच्या आदेशानुसार कत्तल करण्यात आली. याचे वर्णन अकबराचा अधिकृत दरबारी इतिहासकार ‘अबुल फजल’ याने लिहून ठेवले आहे.

औरंगजेबाच्या कारकीर्दीत ज्यांना गरिबीमुळे कर भरता येत नसे अशा शेतकऱ्यांची बायकामुले बाजारात विकल्याची नोंद बर्निए (फ्रेंच) आणि निकोलाओ मनुची (इटालियन प्रवासी, व इतिहासकार) यांनी करुन ठेवली आहे. या परकीय प्रवाशांनी मुघलांचे राज्य स्वत: डोळ्यांनी पाहिलेले होते.

मुघल आणि इतर मुस्लिम राज्यकर्ते असे का वागले ?

याचे मूळ कारण इस्लामच्या, कुराणाच्या आपल्या अनुयायांसाठी तशा स्पष्ट आज्ञा आहेत, हे आहे.
मुघल अथवा अन्य मुस्लिम राजवटींनी केवळ अत्याचारच केले असे नाही. युध्दात मिळालेल्या हिंदु स्त्रियांची विटंबनाही केली. मुहम्मद तुघलकाने तर हिंदू मुली आपल्या लोकांना वाटुन ईदचा सण साजरी केल्याची नोंद ‘इब्न बतुता’ या इतिहासकाराने केली आहे. “युध्दात हाती आलेल्या स्त्रियांशी मुसलमान निकाह करु शकतात” असा कुराणाचाच स्पष्ट आदेश आहे. ( कुराण सुरा 4, आयत -24)

इस्लामी राज्यकर्ते असे का वागले ? याचे उत्तर कुराणाच्या खालील आयतींत सापडते.

१. अल्लाह व इस्लामला न मानणारे लोक तुम्हाला जेव्हा जेव्हा भेटतील, तेव्हा तेव्हा त्यांची मुंडकी तोडा. (कुराण सुरा ४७, आयत ४)
२. अल्लाह व इस्लामला न मानणाऱ्या लोकांची मुंडकी तोडा आणि त्यांच्या हाताची बोटं कापा. आणि हे करताना, हे कृत्य तुम्ही नाही तर तुमच्या करवी अल्लाह करत आहे हे जाणा – कुराण ८:१२, – ८:१७
३. अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताला (मुहम्मद) न मानणाऱ्या लोकांचे हात-पाय तोडा; त्यांना ठार मारा किंवा क्रुसावर लटकवा. (कुराण ५:३३)
(ही केवळ वानगीदाखल उदाहरणे आहेत. कुराणात अशी कित्येक वचने आढळतील.)

मुघलांचा खरा इतिहास हा असा असल्यामुळे, नसिरुद्दीन शहा यांनी आपल्या विधानाबद्दल देशवासीयांची बिनशर्त माफी मागावी. ते जोपर्यंत अशी माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर कडकडीत बहिष्कार टाकणे योग्य ठरेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा