23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषमंदिर पिकनिक स्पॉट नाही; ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसणाऱ्यांनी प्रवेश करु नये

मंदिर पिकनिक स्पॉट नाही; ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसणाऱ्यांनी प्रवेश करु नये

मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

Google News Follow

Related

तामिळनाडूच्या डिंडिगुल जिल्ह्यातील पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने अहिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारण्यात यावा, अशी याचिका मद्रास न्यायालयात दाखल केली होती. त्याप्रकरणी सुनावणी पार पडली आणि याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत राज्य सरकारला आदेश दिले आहेत. मंदिरात ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसणाऱ्यांनी प्रवेश करु नये, हे काय पिकनिक स्पॉट नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

मंदिरामध्ये फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंदूंनाच हिंदू मंदिरात प्रवेश द्यावा. मंदिर हा पिकनिक स्पॉट नाही, हिंदू नसलेल्यांना प्रवेश देऊ नये. गैर हिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊन मगच प्रवेश द्यावा, असे मद्रास उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी सांगितले आहे. तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मदाय यंत्रणेला मंदिरामध्ये बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर हिंदू नसलेल्या व्यक्तींना ‘कोडिमारम’(ध्वजस्तंभ) परिसराच्या पुढे जाण्यास परवानगी नसल्याचं लिहिलेलं असावं. हिंदूंना आपला धर्म मानण्याचा आणि पालन करण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

दक्षिणेतील अनेक मंदिरांमध्ये कोडिमारम म्हणजेच ध्वजस्तंभ उभारलेला असतो. या ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये आणि यासंदर्भात मंदिरामध्ये पाटी लावण्यात यावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. श्रीमती यांनी याबाबतचा निर्णय दिला.

हे ही वाचा:

कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’

अभिमानाचा क्षण! छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारशासाठी नामांकित

तब्बल ३० तासानंतर सोरेन परतले रांचीला

भाजप नेत्याची हत्या करणाऱ्या पीएफआयच्या १५ जणांना फाशी!

मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. श्रीमती यांनी निकाल देताना सांगितलं की, “मंदिरात आणि परिसरात गैर हिंदू पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्यास मंदिर प्रशासानेने खातरजमा करावी. मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये सर्वजण भाविकच आहेत का? त्यांची श्रद्धा आहे का? ते हिंदू धर्मातील परंपरा जपतात का? मंदिराने ठरविलेला पोषाख परिधान करतात का? हे पाहण्याची जबाबदारी मंदिर प्रशासनाची आहे. जर गैर हिंदूंना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर मंदिर प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा