स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख झालाच पाहिजे

भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर

स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख झालाच पाहिजे

खासगी विमानात अंदमानच्या विमानतळाची घोषणा पोर्ट ब्लेअर विमानतळ अशी होत असल्याची बाब नुकतीच भाजपचे नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी लक्षात आणून दिली. या विमानतळाचे नाव वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे असून सुद्धा वीर सावरकर यांच्या नावाचा उल्लेख टाळला जात असल्याचे लक्षात येताच देवधर यांनी तत्काळ विमानात बसल्याबसल्याच यावर आवाज उठवून लोकांना सजग केले. या संदर्भात ते हवाई वाहतूक मंत्रालयाकडे तक्रारही करणार आहेत.

हेही वाचा.. 

मालदीवने दाखविली मस्ती…१० मे नंतर एकही भारतीय सैनिक इथे राहणार नाही!

“५० वर्षे पवारांचे ओझे महाराष्ट्र वाहतो आहे”

हिटमॅन ऱोहित… अब की बार ६०० पार

युपीमध्ये काँग्रेसला धक्का, वाराणसीचे माजी खासदार राजेश मिश्रा भाजपात!

नुकताच त्यांनी पोर्ट ब्लेअर ते हैदराबाद असा विमान प्रवास इंडिगो कंपनीच्या विमानातून केला. त्यावेळी घडलेला हा प्रकार त्यांना प्रचंड खटकला. जसे मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथील विमानतळांचा उल्लेख अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ असा केला जातो त्याच प्रकारे अंदमानच्या पोर्ट ब्लेअर विमानतळाचा उल्लेख ‘वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असा केला गेलाच पाहिजे, अशी मागणी देवधर यांनी केली. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे याची ताबडतोब दखल घेतील अशी अपेक्षा देवधर यांनी व्यक्त केली.

Exit mobile version