मुंबईत सूर्य आग ओकणार; आठवड्याअंती उकाडा वाढणार

कुलाबा वेधशाळेकडून मुंबईकरांना आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन

मुंबईत सूर्य आग ओकणार; आठवड्याअंती उकाडा वाढणार

राज्यासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त उकाड्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. साधारण दमट हवामान असणाऱ्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. येत्या आठवड्याच्या शेवटपर्यंत मुंबईकरांना यातून दिलासा मिळणार नसून तापमानात झालेली वाढ कायम राहणार आहे.

पुढचे काही दिवस तापमान ३७ ते ३८ अंशांवर जाणार असून शनिवार, रविवार आणि सोमवारी उकाडा आणखी वाढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन कुलाबा वेधशाळेकडून करण्यात आले आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईत उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. आणखी दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, शुक्रवारपासून मुंबई आणि नजीकच्या उपनगरांमध्ये पारा वाढण्यास सुरुवात होईल. शुक्रवार (२६ एप्रिल), शनिवार (२७ एप्रिल), रविवार (२८ एप्रिल) रोजी पारा चढा असणार आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाचा पारा चढणार आहे.

हे ही वाचा:

‘हा तर देश तोडण्याचा कट’

क्रूर पाकिस्तानी दहशतवादी अबू हमजाविरोधात लूकआऊट नोटीस

कोरियामध्ये मशीद बांधण्याच्या माजी के-पॉप स्टार दाऊद किमच्या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध

‘जिथे हिंसाचार झाला तिथे निवडणुकांना परवानगी नाही’

आठवड्याच्या शेवटी मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही नागरिकांना दिला जात आहे.

Exit mobile version