नौदलाची ताकद वाढणार; आयएनएस इम्फाळ लवकरच ताफ्यात

ईशान्य भारतातील शहराचे नाव देण्यात आलेली पहिलीच युद्धनौका

नौदलाची ताकद वाढणार; आयएनएस इम्फाळ लवकरच ताफ्यात

भारतीय नौदलाची क्षमता आणखी वाढणार असून नव्या युद्धनौकेच्या समावेशामुळे नौदलाच्या ताकदीत आणखी भर पडणार आहे. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सागरी क्षमता वाढवणारी आयएनएस इम्फाळ भारतीय नौदलात अधिकृतरित्या सामील होणार आहे.

आयएनएस इम्फाळ ही नौदलात लवकरच दाखल होणार असून विशेष म्हणजे ‘आयएनएस इम्फाळ’ ही जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. यात स्वदेशी बनावटीचे स्टेल्थ गाइडेड क्षेपणास्त्र डिस्ट्रॉयर आहे. तसेच ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव देण्यात आलेली ही पहिलीच युद्धनौका आहे. एप्रिल २०१९ मध्ये राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली होती.

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये या युद्धनौकेचा सैन्यदलात समावेश करण्यात येणार आहे. या युद्धनौकेला मणिपूरच्या राजधानीचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताच्या समृद्धीसाठी ईशान्येकडील राज्यांचे महत्त्व यातून स्पष्ट होते.

हे ही वाचा:

डायरोसारखे लोकगीतांचे कार्यक्रम ही आपली शक्ती !

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रत्येक घरी देणार निमंत्रण!

बारामतीतील प्रकल्पासाठी २५ कोटी देणाऱ्या अदानींचे पवारांकडून कौतुक

प्रियांका वड्रा, सचिन पायलट यांना बदलले!

या जहाजाचे वजन ७ हजार ४०० टन असून एकूण लांबी १६४ मीटर आहे. ही युद्धनौका जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि जहाजविध्वंसक क्षेपणास्त्रे आणि टॉरपीडोने सुसज्ज आहे. आयएनएस इम्फाळच्या बंदर आणि समुद्रात दीर्घ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच २० ऑक्टोबर रोजी आयएनएस इम्फाळला भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आले. त्यानंतर या जहाजाने गेल्या महिन्यात विस्तारित पल्ल्याच्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. कोणत्याही स्वदेशी युद्धनौकेला नौदलात सामील करण्यापूर्वी अशा प्रकारची ही पहिलीच चाचणी होती. या चाचणीतील यशामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे.

Exit mobile version