नौदलाची ताकद वाढणार; पाच फ्लीट सपोर्ट जहाजे मिळणार

२० हजार कोटींच्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी

नौदलाची ताकद वाढणार; पाच फ्लीट सपोर्ट जहाजे मिळणार

भारतीय नौदलाची ताकद वाढणार असून यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने बुधवार, १६ ऑगस्ट रोजी नौदलासाठी पाच फ्लीट सपोर्ट जहाजे तयार करण्याच्या प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली आहे. स्वदेशी बनवल्या जाणार्‍या या जहाजांमुळे ‘आत्मनिर्भर भारत’ या केंद्र सरकारच्या मोहिमेला चालना मिळणार आहे.

‘मेक इन इंडिया’ मिशनच्या अनुषंगाने, केंद्र सरकारने भारतीय नौदलासाठी पाच फ्लीट सपोर्ट जहाजे बांधण्यास मान्यता दिली आहे. या जहाजांमुळे समुद्रात तैनात असलेल्या नौदलाच्या ताफ्याला इंधन, शस्त्रे आणि खाद्यपदार्थ भरण्यासाठी मदत मिळणार आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पाची अंदाजे किंमत सुमारे २० हजार कोटी रुपये इतकी आहे. याअंतर्गत पाच प्रगत जहाजे बांधली जाणार आहेत. विशाखापट्टणम येथील संरक्षण मंत्रालयाच्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) द्वारे ही पाच जहाजे बांधली जाणार आहेत. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने येत्या आठ वर्षांत ही जहाजे तयार करून नौदलाला सुपूर्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

हे ही वाचा:

रशियाचे ‘लुना-२५’ भारताच्या ‘चांद्रयान- ३’ च्या दोन दिवस आधी पोहचणार

‘मेक इन इंडिया’मुळे मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर

दिल्लीवरून ‘इंडिया’मध्ये संघर्ष

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या टोल कर्मचाऱ्याला घेतले ताब्यात !

सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने बुधवारी एका उच्चस्तरीय बैठकीत अंतिम मंजुरी दिली. HSL द्वारे अनेक भारतीय खाजगी क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या सहकार्याने पाच फ्लीट सपोर्ट जहाजे बांधली जातील. या प्रत्येक जहाजाचे वजन सुमारे ४५ हजार टन असणार आहे. या प्रकल्पामुळे दीर्घ कालावधीसाठी हजारो नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असून प्रकल्पाशी संबंधित अनेक उद्योगांच्या क्षमतांना चालना मिळणार आहे. तसेच भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भरता आणि आत्मनिर्भरता उद्दिष्टांना चालना देखील मिळणार आहे.

Exit mobile version