‘हे युद्ध अथवा युद्धभूमी नाही. नरसंहार आहे. मी माझ्या जीवनात असे कधीही पाहिले नाही. मी केवळ माझ्या वडिलधाऱ्यांकडून अशा प्रकारच्या सामूहिक हत्यांकाडाबाबत ऐकले होते,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया इस्रायलच्या सैन्याचे मेजर जनरल इताई वेरूव यांनी दिली आहे. पॅलिस्टिनींची दहशतवादी संघटना ‘हमास’च्या क्रूरतेच्या खुणा अशा ठिकठिकाणी आढळून येत आहेत.
गाझा पट्टीच्या जवळील अनेक इस्रायली गावांमध्ये अनेक मृतदेह आढळून आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, फोन रेकॉर्डिंग, छायाचित्रे आदींमधून हिंसाचाराच्या खाणाखुणा दिसत आहेत. दहशतवाद्यांनी बसची वाट पाहात असणाऱ्या प्रवाशांसह रस्त्यांवरच्या, घरांतल्या किंवा अंगणात असलेल्या लोकांची हत्या केली. येथे गोळीबाराने चाळण झालेले शव आढळले आहेत. लहान मुलांच्या रक्ताने ओथंबलेले पाळणे व गाड्या तसेच, रस्त्यांवर मृतदेह आढळत आहेत. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एक हजार जणांची हत्या झाली आहे. यामध्ये बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी १५० इस्रायली नागरिकांचे अपहरण करून त्यांना गाझा पट्टीत नेले आहे. यामध्ये बहुतेक महिला आहेत.
हे ही वाचा:
भारताचा जीडीपी ६.३ टक्के राहण्याची शक्यता
पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतिफची पाकिस्तानात हत्या
“राज्याचा जीव उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी घेतला”
इस्रायलकडून वचपा; हमास सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब हल्ला
एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शनिवारी सकाळी सहा वाजता दहशतवादी गावात घुसताना दिसत आहेत. ते गाडीमधून जात असलेल्या इस्रायलींवर गोळ्या झाडतात आणि गाडी ताब्यात घेतात. तर, आणखी आठ दहशतवादी सकाळी सात वाजता गावात घुसतात. दोन तासांनंतर ते तीन मृतदेह गाडीबाहेर फेकतात. अन्य काही व्हिडीओंत गावांतील अनेकांना त्यांच्या घरांतून बाहेर काढून कैद करून नेले जात असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्यांचे मृतदेह रस्त्यांवर आढळले आहेत. किबुत्स बीयरी या गावात १००हून अधिक मृतदेह आढळले असून त्यात बहुतांश मुलांचा समावेश आहे. तर, किबुत्झ रईम येथे आयोजित नोवा फेस्टिव्हलमध्ये शेकडो तरुण जमले होते. मात्र येथे आलेल्या शेकडो पॅलिस्टिनी दहशतवाद्यांनी सीमा पार करून शेतांवाटे येऊन येथे अंदाधुंद गोळीबार केला. येथे १००हून अधिक मृतदेह आढळले असून दहशतवादी तरुणींना घेऊन गेले आहेत.