धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार

निर्माते मंगेश देसाईंकडून 'धर्मवीर- २' ची घोषणा

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ हा आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवासावरील सिनेमा चांगलाच गाजला. राजकीय वर्तुळात देखील या सिनेमाची चर्चा रंगली. अनेक निरुत्तरित प्रश्नांवर चर्चा रंगल्या. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भाग पेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर बुधवार, ९ ऑगस्ट रोजी धर्मवीर- २ ची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्यातील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली. त्यानंतर आता ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी टॅगलाईन देत धर्मवीर २ ची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमातून आनंद दिघेंच्या जीवनातील कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार याकडे लक्ष असणार आहे.

जेजुरीच्या खंडोबाचा आशिर्वाद घेऊन धर्मवीर २ ची घोषणा निर्माते मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी केली आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग १ च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांचे चरित्र सगळ्या जनतेसमोर आले. धर्मवीर आनंद दिघे हे या माध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि ‘असा माणूस होणे नाही’ हेही सर्वांना समजले. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणे गरजेचे आहे, म्हणूनच ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे – भाग २’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरू करत आहोत, असे धर्मवीर २ ची घोषणा झाल्यावर निर्माते मंगेश देसाई म्हणाले.

हे ही वाचा:

खोट्या बातम्या पसरवणाऱ्या आठ युट्युब चॅनल्सवर बंदी

युती ठाकरेंनी तोडली, भाजपाने नाही

अविश्वास ठरावासाठी बीजेडीचा मोदी यांना पाठिंबा का?

चीनच्या पे-रोलवर पोसलेले पत्रकार किती?

पहिल्या भागात आनंद दिघे यांची राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आनंद दिघे यांच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. त्यामुळे सिनेमाच्या दुसऱ्या भागातही प्रसाद ओक यांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे असणार आहे.

Exit mobile version