25 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरविशेषमागाठाणे ते देवीपाडा मेट्रोचा वेग मंदावला

मागाठाणे ते देवीपाडा मेट्रोचा वेग मंदावला

रस्ता खचल्याने खबरदारीचा उपाय

Google News Follow

Related

बोरिवलीमधील मागाठाणे मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ जमीन खचल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका खाजगी बांधकाम प्रकल्पाच्या कंत्राटदाराला आणि साईट अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती मात्र, नंतर या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, खचलेल्या रस्त्याच्या भागाचा परिणाम मेट्रो मार्गावर दिसून येत आहे.

मागाठाणे ते देवीपाडा या मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोचा वेग मंदावला असून या दोन स्टेशन दरम्यान मेट्रो कासवाच्या गतीने धावताना दिसत आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीतून मुक्त्तता म्हणून मुंबईकर मेट्रोने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. मात्र, मेट्रो स्थानकाच्या नजीकचा रस्त्याचा भाग कोसळल्याने मागाठाणे ते देवीपाडा या स्टेशनदरम्यान मेट्रो संथ गतीने चालवली जात आहे.

‘न्यूज डंका’ने मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळील रस्ता खचतोय याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून ही भीषण घटना समोर आणली होती. हा रस्ता खचून मेट्रो स्टेशनबाहेर धबधब्याचे चित्र निर्माण आले होते. ज्या बाजूने हा रस्ता खचलाय त्याच्या बाजूलाचं मेट्रो मार्गाचा पिलर आहे. शिवाय स्टेशनवर जाण्यासाठीचे जिने इथूनच जातात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरातील वाहनांची वाहतूक बंद ठेवली असून जिनेही बंद करण्यात आले आहेत. तर मेट्रो मार्गाला धोका निर्माण होऊ नये म्हणून मागाठाणे ते देवीपाडा या स्टेशनदरम्यान मेट्रो संथ गतीने चालवली जात आहे.

हे ही वाचा:

सोलापूर जिल्हा ‘धार्मिक पर्यटन क्षेत्र’ म्हणून घोषित करणार, मंगलप्रभात लोढा!

अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल!

खासदार अमोल कोल्हेंचा यु टर्न; शरद पवारांसोबत असल्याचे ट्वीट

विरोधकांची बेंगळुरू बैठक पुढे ढकलली! राष्ट्रवादीतील फूट हे कारण?

प्रकरण काय?

मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ बांधकाम सुरू असून पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून लागतचा रस्ता बंद करण्यात आला. मात्र, या परिसरात मोठ्या संख्येने ऑफिसेस आहेत. रस्ता बंद केल्यामुळे या भागातील नागरिकांना आणि ऑफिसेसमध्ये येणाऱ्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व वाहनांना प्रवेश बंदी केल्यामुळे मुसळधार पावसात आणि चिखलात लोकांना वाट काढत यावं लागत आहे. त्यातच रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाचं आता रस्त्याचा आणखी एक भाग खचल्यामुळे लोकांना आणखी काही दिवस मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पहिल्याच पावसात अशा घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शिवाय आता या घटनेचा परिणाम मेट्रो मार्गावरही दिसून येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा