रेडिओचा आवाज हरपला; अमीन सयानी यांचे निधन

रेडिओचा आवाज हरपला; अमीन सयानी यांचे निधन

रेडिओच्या विविध भारतीचे सुप्रसिद्ध उद्घोषक अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. अमीन सयानी यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ९१ वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अमीन सयानी यांचे चिरंजीव राजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. अमीन सयानी यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

अमीन सयानी यांना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना तात्काळ दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारानंतर काही वेळातच त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा :

जसप्रीत बुमहार कसोटी सामन्यातून बाहेर!

नेहरू-पटेल आणि मौलाना आझादही यूसीसी लागू करण्यास इच्छुक!

जसप्रीत बुमहार कसोटी सामन्यातून बाहेर!

आदिवासीच्या ‘खबरी’मुळे गडचिरोली पोलिसांना कूकर बॉम्ब शोधण्यात यश

अमीन सयानींना आजार काय होता?
अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वयाशी संबंधित इतर आजार होते. गेल्या १२ वर्षांपासून त्यांना पाठदुखीची तक्रार होती आणि म्हणूनच त्यांना चालण्यासाठी वॉकरचा वापर करावा लागत होता.

रेडिओचे अनेक विक्रम मोडले
रेडिओ सिलोन आणि नंतर विविध भारतीवरील त्यांचा ४२ वर्षांचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ‘बिनाका गीतमाला’ या मालिकेने यशाचे सर्व विक्रम मोडले. दर आठवड्याला ते ऐकण्यासाठी रसिक उत्सुक असत. अमीन सयानी यांनी त्यांच्या नावाने ५४ हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रम केले आहेत. १९ हजार जिंगलसाठी आवाज देणाऱ्या अमीन सयानी यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. भूत बंगला, तीन देवियां, कट्टल यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आवाजही दिलेले आहेत. अमीन सयानी यांच्यावर उद्या दक्षिण मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

Exit mobile version