‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताला मिळणार राज्यगीताचा दर्जा

महाराष्ट्राला लवकरच एक राज्यगीत मिळणार असल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताला मिळणार राज्यगीताचा दर्जा

महाराष्ट्राला लवकरच एक राज्यगीत मिळणार असल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या साठी यासंदर्भात घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या राज्यगीतासाठी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गीतामधील दोन कडवी घेतली जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास ‘गर्जा महाराष्ट्र’ हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रात वाजवलं जात. हे गाणं ऐकताना महाराष्ट्रातील जनतेचा ऊर अभिमानाने भरुन येतो. आता याच ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताला राज्यगीतचा दर्जा दिला जाणार आहे.

“गर्जा महाराष्ट्र माझा हे उत्साह वाढवणारं गीत आहे. या गीताच्या शब्दांमध्ये एक उर्जा आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही भावना आहे. हे गीत साडेतीन मिनिटं वाजवायच आहे. त्यामुळे अनुमती घेऊन एक ते दोन मिनिटांमध्ये यातली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा विचार केला आहे,” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, या गीतामधील नेमकी कोणती दोन कडवी राज्यगीतासाठी घेतली जाणार आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा:

“वैभव नाईक पैसे जमवणार तर चौकशी होणारच”

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

येरवडा कारागृहातील कैदी जगात हुशार

हे गीत कवी राजा बढे यांनी लिहिलेलं असून संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे.

Exit mobile version