29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषअमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

मुंबईमधील अंधेरीतील दुर्दैवी घटना

Google News Follow

Related

मुंबईमधील अंधेरी येथे एका मुलाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरी पूर्वेकडील मरोळ भागात ही दुर्दैवी घटना घडली. वसंत ओएसिस असे इमारतीचे नाव असून कृष्णा अग्रवाल असे मृत मुलाचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली असून मुलाचा जागीच मृत्यू झाला.

अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अनुपम अग्रवाल यांचा मुलगा नुकताच आपल्या आईसोबत मुंबईत सुट्टीसाठी आला होता. मात्र, शुक्रवार, ३० जून रोजी संध्याकाळी इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन मुलाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी महापालिकेच्या विलेपार्ले इथल्या कूपर रुग्णालयात पाठवला.

मुलाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज लावून एमआयडीसी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, तो मुलगा डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईल फोनवर गेम खेळत असताना खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांचा मुलगा

अमेरिकेतील नावाजलेले डॉक्टर अनुपम अग्रवाल यांचा मुलगा कृष्णा अग्रवाल हा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे. अनुपम हे अमेरिकेत वास्तव्याला असून तिथले प्रसिद्ध डॉक्टर आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत डॉक्टर अग्रवाल पत्नी आणि मुलगा, मुलीला मुंबईला फिरायला घेऊन येतात. यंदाही ते सुट्टीसाठी मुंबईत आले होते. अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरातील वसंत ओएसिस या इमारतीत ते राहत होते. मात्र, ३० जून रोजी संध्याकाळी इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन पडून मुलाचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा:

अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे

समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?

“त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी’ म्हणायचे का?”

गुजरात उच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाडचा जामीन अर्ज फेटाळला

आत्महत्या की घातपात? तपास सुरु

दरम्यान, कृष्णा याचा तोल गेला, त्याने इमारतीवरुन उडी मारली की त्याला कोणी मुद्दाम ढकलले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी मुलाचा मोबाईल फोन तपासासाठी ताब्यात घेतला आहे. या मुलाकडे आयफोन होता. या मोबाईल फोनमध्ये भरपूर गेम असल्याचं तपासात समोर आलं. त्यामुळे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये हा मुलगा गेम खेळत असताना टास्क पूर्ण करण्यासाठी डिप्रेशनमध्ये गेला असावा आणि त्यातच इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन पडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा