दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगेत चंदनाच्या लाकडाचे ठोकळे आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. विमानतळाच्या टर्मिनल ३ मध्ये अचानक सुगंध येत असल्याने सीआयएसएफच्या जवानांना संशय आला. सीआयएसएफच्या गुप्तचर पथकाने याबाबत शंका व्यक्त करत सर्व प्रवाशांच्या बॅगा शोधण्यास सुरुवात केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. गुयेन थान तुंग असे आरोपीचे नाव असून तो व्हिएतनामचा नागरिक आहे.
विमानतळाच्या सुरक्षेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवाशांच्या बॅगा तपासल्यानंतर सुगंध येणाऱ्या ‘त्या’ बॅगेचा शोध लागला. त्यानंतर बॅगेची तपासणी केली असता बॅगत दोन वुडेन लॉग्ससारख्या वस्तू दिसून आल्या, त्यानंतर प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
हे ही वाचा:
कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपाला ठोकल्या बेड्या !
संजय राऊतांना पुळका, म्हणे नरेंद्र मोदींनी मुस्लीम मंत्री का नाही बनवला?
एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला; सीमा प्रश्नांवर तोडगा काढण्याचा निर्धार
राष्ट्रपती भवनात शपथविधीदरम्यान दिसलेला प्राणी बिबळ्या नव्हेचं!
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, प्रवाशाला तपासणीसाठी डिपार्चर कस्टम कार्यालयात आणण्यात आले. प्रवाशाच्या बॅगेत दोन लाल रंगाच्या वुडेल लॉग्स होत्या. या लाकडाची पडताळणी करण्यासाठी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्यानंतर हे लाकूड लाल चंदनाचे असल्याचे स्पष्ट झाले. त्याची किंमत तब्बल २५ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.