राज्यात आता ‘अल्लाह हु अकबर’ नाहीतर ‘जय श्री राम’चा नारा!

भाजपा नेते नितेश राणेंचे वक्तव्य

राज्यात आता  ‘अल्लाह हु अकबर’ नाहीतर ‘जय श्री राम’चा नारा!

कणकवली मतदार संघातून महायुती-भाजपाचे उमेदवार नितेश राणे हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आताच्या आकडेवारीनुसार, २० हजार मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे, याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आपला विजय पक्का असल्याचे म्हटले आहे. राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि आता अल्लाह हु अकबर नाहीतर जय श्री रामचे नारे ऐकायला येतील, असे नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे म्हणाले, कणकवली, वैभववाडी आणि देवगडच्या जनतेने तिसऱ्यांदा मला काम करण्याची संधी दिली आहे. २६२ गावांमध्ये फिरताना याची मला जाणीव आली, यावेळी जनतेने मला सांगितले की, चिंता करू नका तुम्ही राज्यात हिंदुत्ववादीसाठी केलेले काम आम्हाला पसंत आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरवातीलाच सांगितले होते की, धर्मयुद्धाची ही निवडणूक आहे. माझ्या मतदारसंघात मी उचलेल्या हिंदुत्ववादी विचारामुळे  माझ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात विष जीहाद्यांच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न केला गेला होता. भाषणाचे व्हिडीओ शेअर करून माझ्या विरुद्ध विषारी प्रचार करण्यात आला. मात्र, माझ्या मतदार संघातील हिंदुत्ववादी लोक कडवट पणाने सोबत उभे राहिले. ‘भगव्या विरुद्ध फतवा’ अशी निवडणूक होती. भगवा महाराष्ट्रासह कणकवलीमध्येही जिंकलाय.

ते पुढे म्हणाले, कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. राज्यात महायुती जिंकलेली आहे, भगवाधारी राज्य आलेले आहे. आता राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘अल्लाह हु अकबर’ नाहीतर ‘जय श्री राम’चे नारे ऐकायला येणार, असे नितेश राणे म्हणाले.

हे ही वाचा : 

भाजपा १२५ जागांवर विजय मिळवेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील!

२० हजार अतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान मणिपूरमध्ये तैनात

नक्षलवादावर शून्य सहनशीलता; वर्षभरात २०७ नक्षलवाद्यांचा खात्मा

सायबर ठगांसाठी बँक खाती पुरविणाऱ्या आमीर मणियारला अटक

 

 

Exit mobile version