तत्कालिन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे उभारलेला पूल पुराच्या पाण्यामुळे अवघ्या सहा महिन्यात वाहून गेला. त्यामुळे या गावातल्या महिलांच्या नशिबी पुन्हा एकदा पाण्यासाठी वणवण आली आहे. हा पूल सहा महिन्यातच कसा वाहून गेला याबद्दल येथील गावकऱ्यांनाही आश्चर्य वाटत आहे. आदित्य ठाकरेंनी ही त्र्यंबकच्या शेंद्रीपाड्यात उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात कोलमडला. पार उध्वस्त झाला. सगळचं काम तकलादू, बोगस आणि बनावट. विकासाचे असो वा संघटनेचे. टिकेल तरी कसे? असे ट्विट करून भाजपचे नेते व आमदार अतुल भातळखकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
गेल्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे तालुके अशी ओळख असलेल्या त्र्यंबक, इगतपुरी, सुरगाणा व पेठ परिसरात लोकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. खाली खोल दरी आणि वरून एका लाकडावरून चालण्याची कसरत पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागत होती.
आदित्य ठाकरेंनी उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात कोलमडला. पार उध्वस्त झाला. ही त्र्यंबकच्या शेंद्रीपाड्यातील घटना.
सगळचं काम तकलादू, बोगस आणि बनावट. विकासाचे असो वा संघटनेचे. टिकेल तरी कसे? pic.twitter.com/9jnjZkw5dr— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 21, 2022
डोक्यावर, हातात पाण्याचे हंडे घेत रोज जीव धोक्यात घालून लाकडाच्या बल्ल्यावरून ही दरी ओलांडावी लागत होती.लाकडाच्या बल्ल्यावरून महिलांचा हंडे घेऊन जातानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत प्रचंड व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत आदित्य ठाकरे यांनी येथील महिलांची अडचण दूर केली. अवघ्या काही दिवसांत याठिकाणी पूल उभारून दिल्यामुळे आदित्य ठाकरे यांचे सर्वदूर कौतुकदेखिल झाले होते. शेंद्रीपाड्यातदेखील गेल्या काही दिवसांपासून पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पुराच्या पाण्यात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेला लोखंडी पूल वाहून गेला.
स्थानिकांच्या सूचनेकडे केला कानाडोळा
हा पूल ३० फुटाहून अधिक उंचीवर बांधण्यात आला होता इतक्या कमी उंचीवर पूल बांधल्यास पावसाळ्यात तो पाण्याखाली जाईल, पुलाचा उपयोग होणार नाही, असे त्यावेळीच स्थानिकांनी सांगितले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले. आता पावसाळयात हा पूल चक्क वाहून गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या नशिबी जीवघेणी कसरत करणे आले आहे. विशेष म्हणजे, खालून पाणी अतिशय वेगाने जात असतानाही या वाहत्या पाण्यात महिला लाकडी बल्लीवरून पाय ठेवून पाणी आणण्यासाठी जाताना या महिला दिसत आहेत.
हे ही वाचा:
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार
महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी
रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती
शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय आयोगाला पत्र
३० फूट खोल तास नदीवरून आणावे लागते पाणी
खरशेतच्या तास नदीवरील बल्ल्यांवरून जीव धोक्यात घालून शेंद्रीपाड्यावरील महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागायचे. आदिवासी महिलांना ३० फूट खोल तास नदीवरील बल्ल्यांवरून रोज पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. आधी पुल नाही म्हणून जीव धोक्यात घालत नदी ओलांडणाऱ्या या आदिवासी महिलांसमोर आता पुलावर पाणी आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. पुन्हा तीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी येथील आदिवासी बांधव प्रार्थना करत आहेत.
ठाकरे भेट देणार का?
त्र्यंबकेश्वर जिल्ह्यातील शेंद्रीपाडा येथील आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नातून उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी ये जा करण्याकरीता आता हा मार्ग बंद करण्यात आला आहे. येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी या पूलाची खूप मदत होती. परंतु, आता हा पूलच वाहून गेल्याने शेंद्रीपाड्यातील नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. आता आदित्य ठाकरे इथे भेट देणार का असा सवाल येथील नागरिक करत आहे.