संसद भवनाची सुरक्षा आता ‘सीआयएसएफ’ करणार

दिल्ली पोलिसांकडून संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी ‘सीआयएसएफ’कडे

संसद भवनाची सुरक्षा आता ‘सीआयएसएफ’ करणार

संसद सुरक्षा प्रकरण सध्या देशात चर्चेत असताना या संसद सुरक्षा भंगाप्रकरणी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल Central Industrial Security Force (CISF) कडे देण्यात आली आहे. त्यामुळे संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी ही आता केंद्रीय गृह विभागाच्या अंतर्गत असणार आहे.

सीआयएसएफ सुरक्षा ही अतिमहत्त्वाच्या ठिकाणी तैनात असते. आता केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे गृह विभागाच्या अखत्यारीत संसदेची सुरक्षा असणार आहे. याआधी संसदेची सुरक्षा ही दिल्ली पोलिसांकडे होती. केंद्र सरकारने संसदेची सुरक्षा सीआयएसएफकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सीआयएसएफ ही केंद्रीय लष्कर दलाची एक विशेष तुकडी आहे. सीआयएसएफ ही केंद्र सरकारच्या अनेक इमारतींची सुरक्षा करते. १३ डिसेंबर रोजी संसदेत सुरक्षाभंग झाला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभेच्या अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीमधून उड्या मारल्या. तरुणांनी घोषणा बाजी करत धुराच्या नळकांड्या फोडल्या. अचानक झालेल्या प्रकारामुळे लोकसभेतील खासदार भयभीत झाले आणि गोंधळ उडाला. त्याचवेळी संसदेच्या बाहेर देखील दोघांनी घोषणाबाजी करत नळकांड्या फोडल्या. यामध्ये एक महिला अन दुसरा महाराष्ट्रातील तरुण होता.

हे ही वाचा:

१०८ फुटांच्या अगरबत्तीने प्रभू रामाची अयोध्या सुगंधित होणार

राम मंदिर उद्घाटनासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना मिळाले निमंत्रण!

स्थलांतर प्रश्नाच्या तोडग्यासाठी युरोपियन युनियनच्या ‘स्थलांतर धोरणा’त दुरुस्तीसाठी करार

सीरियामधील व्यक्तीला भेटण्यासाठी साकिबला पडघ्यात पाठवलं

संसदेत जेव्हा हा गदारोळ झाला तेव्हा सुरक्षा कर्मचारी तैनात होते. मात्र त्यांच्या देखत या तरुणांनी संसदेत शिरकाव केल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. संसदेत दोन तरुणांनी अधिवेशनात व्यत्यय आणल्यानंतर थोडा वेळ संसदेचे कामकाम बंद करण्यात आले होते. त्या नंतर पुन्हा कामकाज चालू केले. मात्र या प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेच्या त्रुटी दिसून आल्या. यावर विरोधकांनी देखील आवाज उठावला होता.

Exit mobile version