23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषरोहित शर्माच्या यशस्वी कर्णधारपदाचे रहस्य

रोहित शर्माच्या यशस्वी कर्णधारपदाचे रहस्य

यशस्वी कर्णधारपदाची सगळीकडे चर्चा

Google News Follow

Related

कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करतो आहे. भारताची विजयी घोडदौड सुरू असून संघाने सुरुवातीचे सर्व सामने जिंकले आहेत. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. यात सर्वांत जास्त कौतुक होते आहे ते रोहित शर्माचे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यापासून ते माजी सलामीवीर गौतम गंभीर यांच्यासह सर्व क्रिकेटपटू रोहित शर्मावर स्तुतीसुमने उधळत आहेत. त्याच्या या यशस्वी कर्णधारपदाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

रोहित शर्माने विश्वचषक मोहिमेची सुरुवातच भारतीय संघाला एका मजबूत संघात रूपांतर करण्यापासून केली होती. त्यांनी त्याची सुरुवात पाकिस्तानच्या आयोजनाखाली खेळल्या जाणाऱ्या आशिया कप २०२३ पासून केली होती. श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने विजयाची मोहोर उमटवली होती. तेव्हा भारताचा संघ एकसंध म्हणून सर्वांसमोर आला. त्यानंतर विश्वचषक सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने जिंकली. यात त्याने राहिलेल्या उणिवा दूर करून आपला ११ खेळाडूंचा संघ बांधला. या दोन्ही स्पर्धांमध्ये त्याने स्वतःच्या नेतृत्वाखालील संघाचे गुणदोष, कमकुवत दुवे जाणून त्याच्यावर काम केले आणि मोठ्या आत्मविश्वासाने विश्वचषक स्पर्धेत पाऊल ठेवले.

प्रत्येक खेळाडूचे म्हणणे ऐकणे, त्याला काय पाहिजे ते समजून घेणे, त्याला काय आवडते, काय नाही, या सर्व बाबी जाणून रोहितने आपल्या संघाला एकसंध केले आहे. ‘प्रत्येक खेळाडूला सामन्यादरम्यान अथवा ड्रेसिंग रूममध्ये चांगल्या मानसिक अवकाशाची गरज असते. मी नशीबवान आहे की, माझ्याकडे एक चांगला संघ आणि सपोर्ट स्टाफ आहे,’ असे कर्णधार रोहित सांगतो.

रोहित आणि विराट कोहली यांच्यातही चांगला ताळमेळ दिसून येतो. अनेक ठिकाणी कोहली सल्ला देताना दिसतो. त्या सल्ल्याची अंमलबजावणी रोहित करताना दिसतो. तर, कित्येकवेळा तो कोहलीला शांत करतानाही दिसतो. मात्र असे होऊनही त्यांच्यातील संबंध बिघडत नाहीत तर, ते अधिक चांगले होतात. रोहितने ड्रेसिंग रूममध्ये अतिशय हलकेफुलके वातावरण ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करण्यासाठी मदत मिळते.

हे ही वाचा.. 

पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्याला राजस्थानमधून अटक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन खासदारांनंतर आमदाराचा राजीनामा

मराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा

उत्तर गाझाच्या सीमेवर इस्रायली रणगाडे

गोलंदाजांच्या रणनितीमध्येही अव्वल

आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये रोहित गोलंदाजांच्या रणनितीमध्येही अव्वल ठरल्याचे दिसत आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्याचाच विचार केला तर, मोहम्मद सिराजच्या दोन षटकांत १८ धावा कुटल्या गेल्या होत्या आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. मात्र पाचव्या षटकांत जसप्रीत बुमराहने पाठोपाठ दोन विकेट घेतल्या. तेव्हा रोहितने लगेचच सिराजला हटवून त्याजागी मोहम्मद शामी याच्या हातात चेंडू दिला. या षटकात शामी विकेट घेण्यात अपयशी ठरला तरी त्याने केवळ तीन धावा देऊन इंग्लंडवर दबाव कायम ठेवला. त्याचा फायदा नंतर मिळाला. शामीने आठव्या षटकाच्या शेवटच्या आणि दहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन इंग्लंडचे कंबरडेच मोडले. अशा प्रकारे रोहित फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांच्या रणनितीमध्येही चांगली कामगिरी करतो आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा