भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान गुरुवार, २० जुलै पासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होत आहे. त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओवल येथे हा सामना होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर हा खेळवला जाणारा मालिकेतील दुसरा सामना खास असणार आहे कारण, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा १०० वा सामना असणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले होते. तीन दिवसांमध्ये भारताने सामन्यात बाजी मारली होती. हा सामना भारताने एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या कसोटी सामना जिंकून क्लिन स्वीप देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. तर, वेस्ट इंडिजचा संघ परतफेड करण्यासाठी खेळेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा १०० वा सामना असणार आहे. त्यातही विशेष म्हणजे विराट कोहलीचा हा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विडिंज खेळ उंचावण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल याने दीडशतकी खेळी केली होती. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा याने शतक तर विराट कोहलीने अर्धशतक झळकावले होते. गोलंदाजीत अश्विन याने १२ विकेट घेतल्या होत्या. तर रविंद्र जाडेजा यानेही भेदक मारा केला होता.
खेळपट्टी अहवाल
पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओवल मैदानावर फलंदाजी करणं सोप्प आहे. या मैदानाची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. सुरुवातीचे दोन दिवस खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असेल. त्यानंतर फिरकी गोलंदाजांना येथे मदत मिळेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत ९९ सामने झाले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजने ३० सामन्यात बाजी मारली आहे तर भारताला २३ सामन्यात विजय मिळाला आहे. ४६ सामने अनिर्णित राहिले आहेत.
हे ही वाचा:
वकार यूनुसची दर्पोक्ती; पाक म्हणे भारताला जगात कुठेही हरवू शकतो
मणिपूर; महिलांची नग्न धिंड प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक !
वाढदिवस साजरा न करण्याचे अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पीओपीच्या गणेशमूर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका
संभावित प्लेइंग ११
भारत– रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज– क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), तेगनारायण चंद्रपॉल, क्रिक मॅकेंजी, अलीक अथानाजे, जर्मेन ब्लॅकवूड, जोसुआ डी सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेयर, अल्जारी जोसेफ, केमार रोच, शैनन गॅब्रियल.
दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे.