देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण घेतलेली प्राथमिक शाळा ‘प्रेरणा स्थळ’ बनविण्यात येणार आहे. गुजरातमधील वडनगर येथील प्राथमिक शाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण घेतले होते. प्रेरणा प्रकल्पांतर्गत ही शाळा प्रेरणा स्थळ म्हणून तयार करण्यात येणार आहे.
वडनगर येथील ज्या शाळेत पंतप्रधान मोदी यांनी शिक्षण घेतले, ती शाळा आता प्रेरणास्थळ म्हणून विकसित केली जात आहे. या प्रेरणास्थळी डिजिटल आणि शारीरिक शिक्षणाचीही व्यवस्था केली जाणार आहे. देशभरातील विद्यार्थी या शाळेला भेट देतील. ही शाळा एएसआयद्वारे संरक्षित आहे. ही शाळा पाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून दोन मुलांना पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वडनगरचा विकास एक पर्यटनस्थळ म्हणून केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. चार टप्प्यांतील ही विकास योजना आहे.
हे ही वाचा:
… म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या दंडावर काळ्या फिती
बंगालमधील कोरोमंडल अपघातग्रस्तांना दोन हजारांच्या चलनी नोटांमध्ये मदत
कोल्हापूरमध्ये व्हाट्सऍपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक
‘बीबीसीची करचुकवेगिरीची कबुली म्हणजे भारतविरोधी अजेंड्याला पाठिंबा’
भविष्यात ही शाळा शिक्षणाचा आदर्श बनू शकेल, अशा पद्धतीने ही शाळा तयार करण्यात येणार आहे. तसेच वडनगरवर बनवलेला माहितीपट प्रदर्शित होणार असून तो प्राइम व्हिडीओ आणि डिस्कव्हरीवर दाखवण्यात येणार आहे. डिस्कव्हरी या संस्थेने या माहितीपटाची निर्मिती केली आहे. ज्यामध्ये वडनगरचा इतिहास दाखवण्यात आला आहे. या शहराला समृद्ध इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म याच शहरात झाला आणि त्यांनी सुरुवातीचे शिक्षण वडनगरमधूनच घेतले. याशिवाय बालपणी नरेंद्र मोदींनी वडिलांसोबत वडनगर रेल्वे स्टेशनवर चहा विकला होता. वडनगर स्थानकालाही हेरिटेज रेल्वे स्थानक बनवण्यात आले आहे.